नवी मुंबई : लोकलमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती देणारा जेरबंद

culprits arrested
culprits arrestedsakal media

नवी मुंबई : बॉम्बचे साहित्य (Explosive material) घेऊन तीन व्यक्ती लोकलमधून प्रवास करत असल्याची खोटी माहिती रेल्वेच्या हेल्पलाईनवर देणाऱ्या व्यक्तीला वाशी रेल्वे पोलिसांनी (Vashi railway police) अटक केली आहे. पनव गुलाबराव कालापाडा (३१) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने चोरलेल्या मोबाईलवरून दारूच्या नशेत बॉम्बची खोटी (fake information about bombing) माहिती दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

culprits arrested
अग्निसुरक्षेची माहिती लवकरच एका क्लिकवर; मुंबई अग्निशमन दलाची माहिती

२२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास या व्यक्तीने आरपीएफच्या ११२ या हेल्पलाईनवर संपर्क साधून नेरूळ रेल्वे स्टेशनवरून ३ संशयास्पद व्यक्ती सीएसटी-पनवेल लोकलमध्ये चढल्या असून त्यांच्याकडे बॉम्बचे साहित्य असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता कुणीही संशयास्पद व्यक्ती आढळून आली नाही. लोहमार्ग पोलिसांच्या सायबर सेलने या मोबाईल नंबरचा शोध घेतला असता, हा मोबाईल फोन करावे गाव येथे राहणाऱ्या गणेश परसे यांचा असल्याची माहिती मिळाली. रेल्वे पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, गत महिन्यामध्ये मोबाईल फोन चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर रेल्वे पोलिसांनी या मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स मिळविले. तेव्हा हा नंबर नेरूळच्या शिरवणे गावात राहणारा पनव कालापाडा (३१) हा वापरत असल्याची माहिती मिळाली. आरोपी पनव कालापाडा याने लोकलमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती देऊन रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे व घबराटीचे वातावरण निर्माण होईल असे कृत्य केल्याने वाशी रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com