
अग्निसुरक्षेची माहिती लवकरच एका क्लिकवर; मुंबई अग्निशमन दलाची माहिती
मुंबई : मुंबई शहर (Mumbai) आणि उपनगरात अनेकदा घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे (Fire accidents) अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलातर्फे (Mumbai Fire brigade) इमारत तपासणी प्रणाली विकसित केली जात आहे. अग्निसुरक्षेबाबतची सर्व माहिती लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दल प्रमुख हेमंत परब (Hemant Parab) यांनी दिली. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांनी याबाबत तक्रार केली होती.
हेही वाचा: आमदार रविंद्र चव्हाण वैफल्यग्रस्त झालेत; शिवसेनेने सोडले टीकेचे बाण
अनिल गलगली यांनी मुंबईतील आगीच्या दुर्घटनांबाबत उपाययोजनांचा भाग म्हणून अग्निसुरक्षेची कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली होती. त्यावर अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी उत्तर दिले. लवकरच मुंबई शहरातील सर्व इमारतींच्या अग्निसुरक्षेसंबंधीची माहिती जनतेसाठी संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मुंबई अग्निशमन दलातर्फे इमारत तपासणी प्रणाली विकसित करण्यात येत आहे. सदर प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर संपूर्ण माहिती एकत्रितरित्या उपलब्ध होणार आहे.
२००६ पूर्वीच्या इमारतींची माहिती नाही
मुंबई अग्निशमन दलाकडे शहरातील २००६ पूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतींची माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ मधील कलम ३(१) आणि ३(३) नुसार जानेवारी २०२२ मध्ये प्राप्त झालेले २५५६ फार्म बी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
हेही वाचा: अंबरनाथ, बदलापूर पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार ?
मुंबईतील आगीच्या घटना
वर्ष घटना
२०१७ - ४,४५४
२०१८ - ४,९५९
२०१९- ५,३२४
२०२०- ४,५१२
२०२१- ३,५१५
जून २०२१ पर्यंत
अग्निसुरक्षा प्रमाणपत्र - ६,४२३
आग हाताळण्याचे प्रशिक्षण- ८५०
मॉक ड्रील, बचाव प्रशिक्षण - ९५
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..