भाजीपाल्याची आवक वाढली

भाजीपाल्याची आवक वाढली
भाजीपाल्याची आवक वाढली

नवी मुंबई : गणेशोत्सवात अतिवृष्टीचा फटका बसल्याने भाजीपाल्याचे दर वधारले होते. पितृपक्ष व नवरात्रोत्सवामध्ये देखील भाज्यांचे दर वाढलेलेच होते. मात्र, आता नवरात्रोत्सवानंतर भाजीपाल्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, बाजारात दैनंदिन ६०० गाड्यांची आवक होत आहे. आवक वाढली असली तरी घाऊक बाजारात मागील महिन्याच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर हे स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे गृहिणींना याचा फटका सहन करावा लागत आहे. 

गणेशोत्व काळात पाऊस सुरू असल्याने, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी होत होती. परिणामस्वरूप भाज्यांच्या दरात मोठी वाढ होती. मात्र, आता पावसाळा संपल्याने भाजीपाल्याच्या लागवडीस योग्य व पोषक वातावरण असल्याने भाज्याच्या उत्पादनात वाढ होत आहे. त्यामुळे आता भाज्याची आवकदेखील वाढण्यास सुरुवात झाली आहे. घाऊक बाजारात दर गणेशोत्सवाच्या तुलनेत असणारे दर स्थिर असले, तरी किरकोळ बाजारात विक्रेते चढ्या दराने भाज्यांची विक्री करत आहेत. त्याचा फटका गृहिणींना बसत आहे.

गणेशोत्सवात व नवरात्रोत्सवामध्ये गाड्यांची आवक कमी होती. या काळात उपवास असल्याने मागणीदेखील कमी होत होती. मात्र आता भाज्यांची आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, मागणी देखील वाढली आहे. मात्र भाज्यांचे दर स्थिर आहेत.
- पंकज खराडे, व्यापारी.

भाजीपाला दर              घाऊक बाजारात (रुपये/प्रति किलो)

                 सद्यस्थितीत         महिनाभरापूर्वी
भेंडी           २८-३२       ३०-३६

फ्लॉवर        १५-२५        १४-२०

गवार           ४०-५०         ३०-३६

घेवडा          ३०-४०         २८-३२

कोबी         १६ -२४         १५-२८

ढोबळी मिरची    २५-३५        २२-३२

कोथिंबीर        ३०-३५        २५-३०

मेथी           ४०-४५        ३०-३५

मुळा          २०-३०        २०-३०

पालक         १०-१५         ८-१२

शेपू           १०-१५        ६-१५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com