
मुंबई : राज्य सरकारने ‘इलेक्ट्रिक वाहन धोरण -२०२५’ घोषित केले आहे. २३ मे २०२५ या दिवशी गृह विभागाने याविषयी शासन आदेश (जीआर) प्रसारित केला आहे. या धोरणानुसार राज्यातील प्रमुख महामार्गांवर प्रवासी वाहनांना पथकर (टोल) माफ करण्यात येणार आहे; मात्र शासन आदेशाला दोन महिने होऊनही पथकर माफीवर कोणतीही कार्यवाही होऊ शकलेली नाही.