मुंबईला लाज आणणारी गोष्ट ! लॉकडाऊनच्या काळातही काय सुरु आहे वाचा...

मुंबईला लाज आणणारी गोष्ट ! लॉकडाऊनच्या काळातही काय सुरु आहे वाचा...

मुंबई- लॉकडाऊनच्या काळात मुंबईत वाहनचोरी सुसाट होत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यांवर सर्व काही ठप्प आहे. रस्त्यांवर हवी तशी रहदारी नसते. मात्र तरीही वाहनचोरी कशी होते हाच प्रश्न समोर येतोय. एप्रिल आणि मे महिन्यात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मे महिन्यातल्या पहिल्या दहा दिवसांमध्ये 20 हून जास्त वाहनचोरीचे गुन्हे विविध पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेत. या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक दुचाकी आणि रिक्षा यांचा समावेश आहे. लॉकडाऊन असल्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतो. अशा काळात वाहनचोर मात्र रस्त्यावर कमी वर्दळीचा गैरफायदा घेत वाहनचोरी करताना दिसत आहेत. 

अनेक रिक्षा चोरीला

सांताक्रूझमधील रिक्षाचालक सर्वजीत गौतम यांनी ८ मे रोजी जुहू कोळीवाडा येथील मित्तल हाऊससमोरच्या पदपथाजवळ रिक्षा उभी केली होती. लॉकडाउनमुळे प्रवासी वाहतूक बंद असल्याने ते दुसऱ्या दिवशी रिक्षा सुस्थितीत आहे का हे पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा रिक्षा जिथे पार्क केली होती त्या ठिकाणी दिसली नाही. त्यामुळे गौतम यांनी रिक्षा चोरी झाल्याची तक्रार सांताक्रूझ पोलिस ठाण्यात केली.

सांताक्रूझमध्येच गजधर बांध येथील संतोष पारदुळे यांच्या मालकीची रिक्षा चोरीला गेली. त्यांनी अजय यादव या तरुणाला रिक्षा भाडेतत्वावर चालविण्यास दिली होती. लॉकडाऊन असल्याने अजय याने २२ मार्च रोजी सर विठ्ठलदास नगर येथे ती पार्क केली होती. पारदुळे यांचीही रिक्षा गायब झाल्यानं सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलेपार्लेमधील रिक्षाचालक रमेश सिंग याचीही रिक्षा सांताक्रूझ परिसरातून चोरीला गेल्याचं समजतंय. सांताक्रूझप्रमाणे अंधेरीच्या आंबोली येथेही रस्त्याकडेला पार्क करण्यात आलेली रिक्षा पळविण्यात आली. बोरिवलीमधले रिक्षाचालक रामजस पाल याने कार्टर रोड येथे पार्क केलेली रिक्षा चोरीला गेल्याची तक्रार कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 

दुचाकीचे भाग काढून केली चोरी 

वडाळा अँटॉप हिल येथे राहणाऱ्या तुषार माथूर यांच्या दुचाकीचे भाग काढून चोरण्यात आलेत. माथूर यांनी आपली दुचारी बिल्डिंगजवळ पार्क केली होती. या दुचाकीचे मार्च ते मे या काळात बरेच भाग चोरी करण्यात आले. यामुळे माथूर यांनी 
वडाळा ट्रक टर्मिनस पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

या ठिकाणीही वाहनचोरीच्या तक्रारी दाखल 

  • परळ येथील कर्नाक बंदर-  संतोष गांधी यांची मोटारसायकल त्यांच्या दुकानासमोरून चोरण्यात आली. संतोष यांचं पानटपरीचं दुकानं आहे. 
  • भोईवाडा- परळ येथे राहणाऱ्या मोहम्मद फारूक खत्री यांची अॅक्टिव्हा स्कूटर पदपथावरून चोरीला गेली.
  • डोंगरी- घरगुती साहित्य आणण्यासाठी बझमी फजलअली सय्यद यांनी खरेदी केलेली स्कूटर चोरट्यांनी लंपास केली.
  • बोरिवली- व्यावसायिक असलेले सोनल वोरा यांची मुख्य रस्त्यावर पार्क करण्यात आलेली दुचाकी चोरीला गेली आहे. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
  • साकीनाका- संजयकुमार सिंग या तरुणाची ५ मे रोजी दुचाकी चोरीला गेली. त्यानं पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार केली.
  • नेहरू नगर- वाशी मार्केट येथे भाजी आणण्यासाठी गेलेले भाजीविक्रेता विशाल अवसरे यांच्याही दुचाकी चोरीला गेली आहे.

vehicle theft and vehicle parts theft increased during lockdown check full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com