माथेरानमध्ये वाहने असुरक्षित 

माथेरानमध्ये वाहने असुरक्षित 

माथेरान : पर्यटकाच्या गाडीचे नवीन चाक काढून त्या ठिकाणी जुने चाक बसविण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी माथेरानमधील वाहनतळावर उघडकीस आला. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांच्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

माथेरानमध्ये खासगी वाहने घेऊन येणाऱ्या पर्यटकांसाठी वन विभाग आणि वन व्यवस्थापन समितीच्या वतीने वाहनतळ आहे. नेरूळ येथे राहणारे अनुराग पांडे हे शनिवारी माथेरानमध्ये पर्यटनासाठी आले होते. त्यांनी या वाहनतळावर कार उभी केली होती. रविवारी ते घरी निघाले असताना त्यांच्या गाडीचा नवीन टायर काढून तिथे जुना टायर बसविल्याचे दिसले. त्यामुळे ते संतप्त झाले. त्यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना विचारले असता वन व्यवस्थापन समितीला विचारा असे सांगितले. 

त्यानुसार अनुराग यांनी वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी जाधव यांनी सर्व माहिती घेऊन नुकसानभरपाई देण्याची ग्वाही दिली. 
याबाबत जाधव यांनी सांगितले, की अनुराग पांडे या पर्यटकाच्या गाडीचा नवीन टायर काढून जुना बसवण्यात आला होता. त्यानुसार त्यांना वन व्यवस्थापन समितीमार्फत भरपाई देण्यात येणार आहे. या अगोदरही वाहनतळावर पर्यटकांच्या वाहनांची मोडतोड झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 

सीसी टीव्ही कॅमेरे बंद 
माथेरानमधील वाहनतळावर नजर ठेवण्यासाठी वन व्यवस्थापन समितीमार्फत सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याधील काही बंद आहेत; तर काही काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनतळामध्ये चोरट्यांचे फावते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com