पोलिसांसाठी "व्हेंटिलेटर'चा खास शो 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

मुंबई - "व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटाचा खास शो पोलिसांसाठी घेण्यात आला. मुंबईतील फिनिक्‍स मॉलमधील पीव्हीआर मल्टिप्लेक्‍समध्ये झालेल्या खास शोला पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि सहआयुक्त देवेन भारती उपस्थित होते. तसेच चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक राजेश मापुसकर, अभिनेते आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, नीलेश दिवेकर, निर्मात्या मधू चोप्रा, सहनिर्मात्या कुनिका आणि "झी स्टुडिओ'चे बिझनेस हेड निखिल साने, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त उपस्थित होते. 

आशुतोष गोवारीकर म्हणाला, की आजचा हा शो माझ्यासाठी खूप खास आहे. माझे वडील पोलिस खात्यात होते. त्यामुळे मला माझ्या कुटुंबासोबत बसूनच चित्रपट पाहण्याचा आनंद मिळाल्याचे समाधान आहे.' पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर म्हणाले, रोजच्या कामाच्या व्यापातून कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. पण, या चित्रपटाच्या निमित्ताने एक कुटुंबच इथे एकत्र येऊन चित्रपट बघत असल्याचा मला आनंद होत आहे. कुटुंबव्यवस्था जपणे हा या चित्रपटाचा मुख्य संदेश आहे. या चित्रपटाबद्दल बरेच ऐकले होते. आज सगळ्यांसोबत बसून चित्रपट पाहायला मिळतो आहे याचा आनंद होत आहे. 

Web Title: ventilator special show for Police