ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे मुंबईत निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

1990 मध्ये ते हिंदी सिनेमा क्षेत्रात कार्यरत होते. त्यानंतरही त्यांनी काही सिनेमाचे संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले. उमराव जान या सिनेमासाठी 1982 त्यांना नॅशनल फिल्म अवॉर्ड ही मिळाला होता.

मुंबई : ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे आज (सोमवार) 92 व्या वर्षी जुहू येथील सुजय रुग्णालयात वृध्दपकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनियाच्या आजारासाठी त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी रात्री 9.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

खय्याम यांना 2011 मध्ये पद्मभुषण पुरस्कारने गौरविण्यात आले होते. त्याच बरोबर 2007 मध्ये त्यांना संगीत नाटक ऍकॅडमीचा पुरस्कारही मिळाला होता. 1990 मध्ये ते हिंदी सिनेमा क्षेत्रात कार्यरत होते. त्यानंतरही त्यांनी काही सिनेमाचे संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले. उमराव जान या सिनेमासाठी 1982 त्यांना नॅशनल फिल्म अवॉर्ड ही मिळाला होता.

महम्मद जोहूर खय्याम हशमी यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1927 रोजी सध्याच्या पाकिस्तान मधील पंजाब प्रांतात झाला होता. बाल वयापासून संगित आणि सिनेमाची ओढ असलेले खय्याम शाळकरी वयातच त्यांच्या काकाकडे दिल्लीत आले होते. मात्र, नातेवाईकांनी त्यांच्यावर शाळा शिकण्याचा आग्रह केल्यावर ते लाहोरला आले. तेथे तेथे त्यांनी एका प्रसिध्द पंजाबी संगीतकार संगीताचे धडे घेतले. या संगीतकाराला सहाय्यक म्हणूनही त्यांनी सहा महिने काम केले.तेथून ते पुन्हा लुढियाना येथे आले. तेव्हा ते 17 वर्षाचा होते.दुसऱ्या महायुध्दाच्या काळात सैन्यात सेवा बजावताही संगीताची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेरीस ते स्वप्न साकार करण्यासाठी मुंबईत आले.

संगीतकार रेहमान वर्मा यांच्यासह शर्मा-वर्मा या नावाने त्यांनी 1948 च्या हीर-रांझा या सिनेमात संगीतकार म्हणून प्रदार्पण केले. मात्र, त्यांची जोडी फार काळ टिकू शकली नाही. रहेमान वर्मा हे पाकिस्तान गेले, मात्र खय्याम यांचा संगीत क्षेत्रातील प्रवास सुरूच राहिला.

1961 च्या 'शोला और शबनम' या सिनेमामुळे ते चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यापूर्वी त्यांची काही गाणी गाजली होती. त्यांनी संगीतबद्ध केलेली कभी कभी, उमराव जान, नुरी अशा अनेक सिनेमातील गाणी आजही गुणगुणली जातात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veteran music composer Khayyam passed away at 92