उपाध्यक्ष, उपसभापतिपद शिवसेनेला? 

मृणालिनी नानिवडेकर
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

मुंबई - अयोध्यावारीनंतर शिवसेना-भाजपचे सुधारलेले संबंध दाखवण्यासाठी उपाध्यक्षपदी विजय औटी, तर परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची निवड होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना तसे आश्‍वासन दिले असून अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ही निवडणूक होईल, असेही सांगण्यात आले. 

दरम्यान, मराठा आरक्षणाचा मसुदा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना सांगावा, अशी शिवसेनेची अपेक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर शिवसेना पक्षप्रमुखांच्या सूचनेनुसार सुभाष देसाई यांच्याशी याबाबत संवाद झाल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. 

परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्या मतात काहीशी तफावत असल्याने अपक्ष म्हणून निवडून आलेले शिवसैनिक श्रीकांत देशपांडे यांचे नावही चर्चेत आहे. शिवसेनेला पदे दिल्याने सहकाऱ्याची नाराजी दूर होईल असे भाजपला वाटते. निवडणुकीच्या तोंडावर नाराज शिवसेनेस राजी करण्यासाठी भाजपने गेल्या चार वर्षांपासून अडलेले निर्णय मार्गी लावण्याचे ठरवले असल्याचे समजते. मंत्रिमंडळ विस्तारात सेनेला हवी ती खाती मिळतील काय, हे सांगणे कठीण असले तरी विधानसभेचे उपाध्यक्षपद आणि विधान परिषदेचे उपसभापतिपद शिवसेनेला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजपने यासंबंधात शब्द दिला आहे, असे समजते. परिषदेतील सत्ताधारी आणि विरोधकांची तुल्यबळ संख्या लक्षात घेता राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही या निवडणुकीत विश्‍वासात घेतले जाईल, असे समजते. 

संकेत धाब्यावर 
विधानसभेत भाजप आणि शिवसेना एकत्र असल्यास उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झालीच तर ती जिंकता येईल. विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद द्यावे असे मानले जाते. पण या संकेतांना सतत धाब्यावर ठेवले जाते आहे. त्यामुळे सेना-भाजपत मैत्रीचे पर्व निर्माण झाल्यास विजय औटी यांना उपाध्यक्ष होण्याची संधी मिळेल. परिषदेत मात्र समसमान मते असल्याने तीन अपक्ष आमदारांचे फावते आहे. सेनेतील बंडखोर प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. या वेळीही संधी मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे, असे समजते. सेना-भाजपने त्यांना पाठिंबा दिल्यास गणित सोपे होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vice President Deputy Chairperson Shiv Sena