छात्र सेनेची शिक्षण विभागाकडून उपेक्षा

पंजाबराव ठाकरे
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

सदर विषयक ऐच्छिक केल्यामुळे व शिक्षण विभागाच्या उदासिन धोरणांमुळे हा विषय शिक्षण क्षेत्रातून आता अडगळीला पडल्यात जमा होत आहे. शिक्षक कागदोपत्री या विषयाची अंमलबजावणी करत असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये या विषयाचे गांभिर्य राहिलेले नाही. विद्यार्थ्यांच्या सामाजिक आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या विषयाकडे शिक्षण विभागाने सकारात्मक होत लक्ष देण्याची गरज पालकांमधून व्यक्त होत आहे

संग्रामपूर - शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांना एक मार्गीकेवर बांधून त्यांना देशभक्ती, शिस्त आणि समाजसेवा घडविण्यासाठी प्रेरीत व प्रोत्साहन करत त्यांने ते अंगीकारावे या महान उद्देशाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र छात्र सेवा (एम. सी. सी) या विषयाकडे शालेय शिक्षण विभागाचे गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. 

महाराष्ट्र छात्र सेना उपक्रमांतर्गत सैन्य दल तसेच पोलिस दलामध्ये रोजगार मिळविण्याच्या दुष्टीकोनातून मोठा हातभार लागून, पायाभूत शारिरीक व मानसिक अभ्यास यातून काही प्रमाणात करण्यात येत होता. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या विषयाची शाहा स्तरावर केवळ कागदोपत्रीच अंमलबजावणी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या उपक्रमाची सुरवात गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी तत्कालीन युती सरकारनेचे मुख्ममंत्री मनोहर जोशी यांच्या पुढाकारातून राज्यातील प्रत्येक शाळेत एम. सी. सी. विषय अनिवार्य केला. त्यासाठी शाळेतील शारिरीक शिक्षकाकडे या विषयाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. इयत्ता नववी व दहावी यासाठी प्रत्येकी दोन तासिका देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सांघीक कवायत, परेड, संचालन व त्याच बरोबर सामाजिक उपक्रम राबविण्याची सक्ती करण्यात आली होती. यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता, आकर्षक सैनिकी गणवेश आदी साहित्य देण्यात येत होते. विद्यार्थी देखील या विषयात सक्रिय होऊन मैदानांवर कवायती साद करुन उत्साही होत होते. या विषयाचे गुणपत्रिकामध्ये गुण मिळत होऊन महाविद्यालयीन जीवनासाठी एन. सी. सी. सहभाग याशिवाय भविष्यात एस. सी. सीच्या माध्यमातून  विविध भर्ती प्रक्रियेसह सैनिक भरतीसाठी सदर विषयाचा उपायोग होतो. 

शिक्षण विभागाने टाकले अडगळीला

सदर विषयक ऐच्छिक केल्यामुळे व शिक्षण विभागाच्या उदासिन धोरणांमुळे हा विषय शिक्षण क्षेत्रातून आता अडगळीला पडल्यात जमा होत आहे. शिक्षक कागदोपत्री या विषयाची अंमलबजावणी करत असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये या विषयाचे गांभिर्य राहिलेले नाही. विद्यार्थ्यांच्या सामाजिक आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या विषयाकडे शिक्षण विभागाने सकारात्मक होत लक्ष देण्याची गरज पालकांमधून व्यक्त होत आहे. 

शिक्षण लोकप्रतिनिधीं लक्ष देतील का?

राज्यातील शैक्षणिक समस्यांच्याबाबत शासन दरबारी आवाज उठविण्यासाठी विधी मंडळात असलेले शिक्षक आमदार हे प्रतिनिधींत्व करत असतात. येत्या हिवाळी अधिवेशानात आवाज उठवून राज्य सरकारला या विषयावर विचार करुण ठोस असे धोरण राबविण्यासाठी भाग पाडण्याची गरज असल्याचेही मत पालक वर्गांतून होत आहे. 

खाकी झाली जमा

शालेय जीवनात शिस्त आणि देशभक्तीसाठी करावयाची सेवा पाहता विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना महाराष्ट्र छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळी जबाबदारी देऊन त्यांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग करुन घेतल्या जात असायचा. यासाठी त्यांना खाकी गणवेष देऊन परेडमध्येही समावेश करुन घेतल्या जात होता. परंतु, गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याकडून खाकी गणवेश जमा करण्यात येऊन या उपक्रमाचा विसर पडला आहे. 

Web Title: vidarbha news: ncc