विधान परिषद सदस्यांना दिली शपथ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

मुंबई - विधान परिषदेवर निवडून आलेले उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, सुरेश रामचंद्र धस, रामदास भगवानरावजी आंबटकर, नरेंद्र भिकाजी दराडे, विप्लव गोपीकिसन बाजोरिया या पाच सदस्यांना सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली.

विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार सर्वश्री राज पुरोहित, विजय ऊर्फ भाई गिरकर, अनिल सोले, गोपीकिसन बाजोरिया, डॉ. नीलम गोऱ्हे आदींसह विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे आदी उपस्थित होते.

Web Title: vidhan parishad member Oath