Vidhan Sabha 2019 : प्रकाश मेहतांच्या मनसे उमेदवाराला जाहीर शुभेच्छा?; व्हिडिओ व्हायरल

निलेश मोरे
Sunday, 13 October 2019

कोण कुणाची गळाभेट घेतंय, कोण कुणाचे फोटो, व्हिडियो शेअर करतंय  तर कुणी कुणाच्या विधानाचा विरोध करताना दिसतंय. मात्रं याचा मतदानावर वा मतदारांवर थेट परिणाम होतोय का हेच पाहावं लागेल.

मुंबई : राजकारणात काहीही होऊ शकतं, सत्तेची पाने पालटण्यासाठी राजकारणात कोणतेही डावपेच, कारणे आखली जातील याचा काही नेम नाही. सध्या राज्याच्या विधानसभा निवडणुकांत राजकारणाची समीकरणे बदलताना दिसत आहे. कोण कुणाची गळाभेट घेतंय, कोण कुणाचे फोटो, व्हिडियो शेअर करतंय  तर कुणी कुणाच्या विधानाचा विरोध करताना दिसतंय. मात्रं याचा मतदानावर वा मतदारांवर थेट परिणाम होतोय का हेच पाहावं लागेल.

चुक्कल काय म्हणाले?
घाटकोपर पूर्वेतून गेल्या सहा वेळा आमदार निवडून येणाऱ्या प्रकाश मेहतांना यंदा तिकीट न दिल्याने मेहता समर्थकांमध्ये मोठी नाराजी दिसून आली. मेहता समर्थकांची नाराजी ओळखून मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचे उमेदवार गणेश चुक्कल यांना प्रकाश मेहता शुभेच्छा देत असल्याचा व्हिडियो शेअर केला जातोय. या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्हिडियो कधीचा आहे? कोणत्या कार्यक्रमातला आहे आणि निवडणुकांमध्येच हा व्हिडियो का शेअर होतोय. याबाबत उमेदवार गणेश चुक्कल यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी मला याबाबत काहीच माहिती नाही. मात्र, मेहता यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांचा स्वभाव दिलदार आहे. मेहतांच्या शुभेच्छा या माझ्यासाठी आशीर्वादपर असल्याचे चुक्कल म्हणाले आहे.

आम्ही नटरंगसारखं काम केलं नाही; फडणवीसांचे पवारांना उत्तर

मिसळसाठी राज ठाकरेंनी वळवला ताफा

प्रकाश मेहता का नाराज?
राज्याच्या गृहनिर्माण खात्याची जबाबदारी सोपविलेल्या मेहता यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं मंत्रिपद सोडावं लागलं होतं. त्यानंतर पाठोपाठ निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीचा पत्ताही कट झाला. यामुळं त्यांचे समर्थक खूप नाराज होते. त्यांच्या जागी उमेदवारी देण्यात आल्या पराग शहा यांच्या गाडीवर मेहता समर्थकांनी हल्लाही केला होता. यातून भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्याचा फायदा घेण्याचा मनसेकडून प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. मध्यंतरी शहा आणि मेहता यांच्या दिलजमाई झाल्याचं जाहीर झालं. पण, ही दिलजमाई समर्थकांमध्ये झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 bjp leader prakash mehta greets mns candidate ghatkopar video viral