Vidhan Sabha 2019 : तरुणांना आकर्षित करणारा; काँग्रेस आघाडीचा जाहीरनामा

congress leader sanjay nirupam statement against party press conference
congress leader sanjay nirupam statement against party press conference

मुंबई : दर्जेदार शिक्षण, आरोग्य, सुनियोजित शहर, सुविधायुक्त गावे, पर्यावरण संवर्धन, शेतीला गती, उद्योग यांचा आघाडीच्या शपथनामामध्ये समावेश असून, ग्रामीण मतदाराबरोबरच शहरी मतदारालाही आकर्षित करण्याचा प्रयत्न, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केला आहे. जागा वाटपामध्ये काँग्रेसने 157, राष्ट्रवादीने 117 तर मित्र पक्षांनी 14 जागा, असे जागा वाटप करण्यात आले आहे.

तरुणांना आकर्षित करणार जाहीरनामा
काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सध्या शहरी तरुण मतदार दुरावल्याचे दिसत आहे. त्यामुळेच त्याला आकर्षित करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात अनेक मुद्द्यांचा समावेश केला आहे. त्यात प्रामुख्याने उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज देण्याची योजना महत्त्वाची मानली जात आहे. कामगारांना 21 हजार किमान वेतन तर, ८०% स्थानिक भूमिपूत्रांना नोकऱ्या देण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची घोषणा आघाडीने जाहीरनाम्यात केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील ठळक घोषणा

  1. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार
  2. तरूण सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा पाच हजार रूपये भत्ता
  3. उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज
  4. कामगारांना किमान 21 हजार वेतन
  5. राज्यातील प्रत्येक नागरिकास आरोग्य विमा
  6. महिला गृह उद्योगाच्या विक्री उत्पादनाला जीएसटी पूर्णपणे माफ करणार
  7. दिव्यांगाना बीपीएलच्या सवलती देणार
  8. सर्व महापालिका हद्दीतील 500 चौरस फूट घरांना मालमत्ता करमाफी
  9. ८०% स्थानिक भूमिपूत्रांना नोकऱ्या देण्यासाठी विशेष कायदा
  10. घर तेथे नळ, नळ तेथे पाणी योजना राबविणार
  11. मुबंई, पुणे, आणि पिंपरी-चिंचवड व्यतिरिक्त नियोजनबद्ध शहरीकारणासाठी स्वतंत्र विकास प्राधिकारणांची स्थापना करणार
  12. महिला बचत गटांना सरकारच्या वतीने सुरुवातीला 2 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय उपलब्ध करून देणार व टप्प्याटप्प्याने वाढविणार
  13. नव्या मोटार वाहन कायद्यान्वये आकारण्यात येणार दंड कमी करणार
  14. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील मागास तालुक्यात उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी स्वतंत्र धोरण आखणार
  15. जात पडताळणी प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणणार
  16. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव
  17. ठिबक आणि तुषार सिंचनासाठी 100% अनुदान देणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com