Vidhan Sabha 2019 : राज ठाकरे यांचे सॉफ्ट हिंदुत्व; तरुण मनसेकडे आकर्षित होणार?

टीम ई-सकाळ
Friday, 11 October 2019

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी कालपासून पुन्हा रणशिंग फुंकले आहे. मुंबईत त्यांच्या काल दोन सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी मांडलेल्या भूमिकेत राज थोडे सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकल्याचे दिसत आहे. 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत एकही रिंगणात न उतरवूनही महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सर्वाधिक चर्चेत राहिले होते. त्यांच्या जाहीर सभांना तुफान गर्दी झाली. अर्थात त्या गर्दीचं मतांमध्ये परिवर्नत झालं नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी कालपासून पुन्हा रणशिंग फुंकले आहे. मुंबईत त्यांच्या काल दोन सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी मांडलेल्या भूमिकेत राज थोडे सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकल्याचे दिसत आहे. 

फडणवीसांचा कॉपी करून पास होण्याचा प्रयत्न

शिवसेनेला केले लक्ष्य
राज ठाकरे यांच्या मुंबईत काल दोन ठिकाणी जाहीर सभा झाल्या. पहिली सभा घाई घाईत आटोपल्याचं दिसलं. पण, दुसरी सभा मात्र खास राज ठाकरे यांनी गाजवल्याचं दिसलं. सभेत त्यांना उपस्थितांकडून प्रतिसादही मिळत होता. सभेत त्यांनी आरेतील वृक्षतोडीचा विषय मांडला. त्याचेवळी त्यांनी शिवसेनेलाही लक्ष्य केलं. आरे जंगलाबाबत शिवसेना बॅकफूटवर गेली तसेच जागा वाटपातही शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा आल्याबद्दल राज यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

एकच नियम आधी खिसा गरम, मगच प्रचार 

तरुणांना आकर्षित करण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्व
राज ठाकरे यांनी काल, मुंबईतील दोन्ही जाहीर सभांमध्ये हिंदू सणांचा उल्लेख करत, हे सण साजरे केलेच पाहिजेत, अशी भूमिका मांडली. यात त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सवाचा उल्लेख केला. मुळात दोन्ही सण हे मुंबईत मोठ्या प्रमाणावर सााजरे केले जातात. हे सण साजरे केलेच पाहिजेत, यावर मुंबईत तरुण आग्रही असतात. इतर कोणतेही पक्ष या विषयावर बोलत नाही. त्यामुळं तरुणांना आपल्याकडे पुन्हा आकर्षित करण्यासाठीच राज ठाकरे यांनी हे सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारल्याचं दिसत आहे. मुळात मनसेला एकेकाळी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर समर्थन केलं होतं. पण, हळू हळू तरुण मनसेपासून दुरावला. त्याला पुन्हा आपलसं करण्याचा राज यांचा प्रयत्न असावा.

काँग्रेस-राष्ट्रवादीला टाळले
राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज असल्याचे मत राज यांनी दोन्ही सभांमध्ये मांडले. गेली पाच वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोधीपक्षाची भूमिका बजावली आहे. पण, राज्यात लोकांची बाजू मांडणारा, सत्ताधाऱ्यापुढे न झुकणारा विरोधीपक्ष हवा असल्याचं राज ठाकरे म्हणाले, असले तरी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाच वर्षांतील कामगिरीविषयी एक शब्दही काढला नाही. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटीलच भाजपमध्ये जॉईन झाल्याचं राज म्हणाले. पण, त्यांनी काँग्रेसवर टीका केली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 mns chief raj thackeray speech in mumbai marathi festival hindutva