Vidhan Sabha 2019 : आरे कॉलनीत आता गवत लावणार का?; राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला

टीम ई-सकाळ
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

मुंबई : मागाठाणे येथील प्रचार सभेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेलाच लक्ष्य केले. शिवसेनेचा जाहीरनामा, आरेविषयी शिवसेनेची भूमिका, असे मुद्दे उपस्थित करत, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.

मुंबई : मागाठाणे येथील प्रचार सभेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेलाच लक्ष्य केले. शिवसेनेचा जाहीरनामा, आरेविषयी शिवसेनेची भूमिका, असे मुद्दे उपस्थित करत, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. सत्तेवर आल्यानंतर आरे कॉलनीत गवत लावणार का? असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. दरम्यान, या सभेनंतर राज ठाकरे यांची दिंडोशीमध्येही जाहीर सभा झाली.

मोदीजी, फडणवीसजी बेरोजगारीवर बोला; राहुल गांधींची टीका

भावनिक मुद्दे उपस्थित करतात
काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे भाजपला सत्ता दिली. पण, त्यांनी तिच री ओढली असे सांगत राज ठाकरे म्हणाले, ‘भाजप-शिवसेनेने 2014च्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली होती. पण, त्यातलं त्यांनी काहीच केलं नाही. जनताही त्यांना जाब विचारत नाही. त्यामुळं त्यांनाही त्याचं काही वाटत नाही. निवडणुका आल्याकी ते भावनिक मुद्दे उपस्थित करतात. त्यांना तुम्ही मतदार कसे आहात हे पक्के माहिती झाले आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांना जाब विचारत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही.’

आता तिथे गवत लावणार का?
मुंबई आणि इतर शहरातील रस्त्यांचा विषय मांडताना राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये खड्डे नसल्याचे सांगितले. तेथे महापालिकेत सत्ता असताना, रस्त्यांची चांगली कामं करून घेतली होती. एकाही काँन्ट्रॅक्टरकडून टक्केवारी घेतली नाही म्हणून, ते शक्य झाल्याचं, राज ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेनेबाबत राज ठाकरे म्हणाले, ‘शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात, सत्तेवर आल्यानंतर आरे जंगल घोषित करू. आता तिथे गवत लावणार का? शिवसेनेने जाहीरनामा मांडला. त्यात आरेचा साधा उल्लेखही नाही. त्यांना बँकांमध्ये सामान्यांचे पैसे अडकल्याशी काही देणं घेणं नाही. 2014मध्ये सहकार कायद्यात सुधारणा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्याचं काय झालं? आता बँका बुडत आहेत?’

डोंबिवलीकर म्हणतात, पंतप्रधानसाहेब आमच्याकडं मतं मागायला येऊ नका

राज ठाकरे काय म्हणाले?

  1. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हवीच कशाला?
  2. केवळ पंतप्रधानांना वाटलं म्हणून बुलेट ट्रेन करायची?
  3. बुलेट ट्रेनमुळे दहा हजार कोटींचे कर्ज
  4. मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती बांधवांनाही बुलेट ट्रेन नको
  5. बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाऊऩ करायचं काय?

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 mns leader raj thackeray statement on uddhav thackeray Mumbai