Vidhan Sabha 2019 : भविष्यात पेपर वाचण्यापुरतेच राहतील; उद्धव ठाकरेंचा राज यांना टोला

टीम ई-सकाळ
Saturday, 12 October 2019

मुंबई : एकेकाळी महाराष्ट्राची सत्ता एकहाती द्या, अशी मतदारांना साद घालणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता विरोधीपक्षाची सूत्रे हाती द्या, असे आवाहन मतदारांना करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या भूमिकेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.

फडणवीस सरकारची पहिली वीट रचणारे पवार : शिवसेना

मुंबई : एकेकाळी महाराष्ट्राची सत्ता एकहाती द्या, अशी मतदारांना साद घालणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता विरोधीपक्षाची सूत्रे हाती द्या, असे आवाहन मतदारांना करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या भूमिकेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.

फडणवीस सरकारची पहिली वीट रचणारे पवार : शिवसेना

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज, शिवसेनेच्या 'हीच ती वेळ' या वचननाम्याचे मातोश्री निवासस्थानी प्रकाशन झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला. भाजपसोबत जाहीरनामा नसल्याबद्दलही त्यांनी भाष्य केले. दोन्ही पक्ष एकत्र असून, एकत्रच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

'ते पेपर वाचण्यापूरतेच राहतील'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांना विचारणा करण्यात आली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता. 'पुढच्या निवडणुकीपर्यंत ते फक्त पेपर वाचण्यापूरते राहतील.', अशा शब्दांत टोला लगावला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रंगत नसल्याचे मत ही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले, 'निवडणूक रंगत नाहीय कारण समोर विरोध करणारेच कोणी दिसत नाही. ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे निकाल स्पष्ट आहे.'

शिवसेनेचा स्वतंत्र वचननामा; वाचा काय दिली आश्वासने

उद्धव ठाकरे म्हणतात...

  1. आरे कॉलनी संदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी
  2. जनता शिवसेना-भाजप महायुतीलाच पुन्हा आशीर्वाद देणार
  3. भाजप-शिवसेना एकत्रच काम करणार
  4. दहा रुपयांत जेवण ही अम्मा कॅन्टीनची कॉपी नाही
  5. अतिशय विचार करून वचननामा जाहीर केलाय
  6. एकही वचन खोटं ठरणार नाही
  7. 300 युनिटपर्यंत घरगुती वीज बिल 30 टक्क्यांनी कमी करणार
  8. दहा रुपयांत सकस आणि चांगलं जेवण मिळणार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 shiv sena leader uddhav thackeray comment on raj thakre Mumbai