esakal | Vidhan Sabha 2019 : शिवसेनेचा स्वतंत्र वचननामा; वाचा काय आहेत शिवसेनेची आश्वासनं
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 shivsena vachannama manifesto 2019 udhav thakre aditya thakre

Vidhan Sabha 2019 : शिवसेनेचा स्वतंत्र वचननामा; वाचा काय आहेत शिवसेनेची आश्वासनं

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : भाजप सोबत महायुतीची घोषणा केलेल्या  शिवसेनेने आज, आपला स्वतंत्र वचननामा जाहीर केला. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी वचननामा प्रसिद्ध केला. 'हीच ती वेळ' असं वचननाम्याला नाव देण्यात आलंय. भाजपसोबत युती असताना, स्वतंत्र वचननामा का? यावर भाजप-शिवसेना दोघेही एकत्र काम करणार आहोत. जाहीरनामे वेगळे असले तरी, त्यांच्याकडील काही चांगले मुद्दे असतील, तर तेही आम्ही स्वीकारू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

फडणवीस सरकारची पहिली वीट रचणारे पवारच : शिवसेना

जे वचन देतो ते पूर्ण करतो
ठाकरे म्हणाले, 'शिवसेना वचन देते ते पूर्ण करते. भाजप-शिवसेना आम्ही दोघेही एक आहोत. या निवडणुकीनंतर एकही प्रश्न अनुत्तरीत राहणार नाही, याची मी ग्वाही देतो. हा वचननामा तयार करताना, राज्याच्या तिजोरीवर किती भार पडले, याचाही विचार करण्यात आला आहे. प्रमुख्याने अन्न आणि आरोग्य चाचणी या दोन महत्त्वाच्या गोष्टींचा वचननाम्यात समावेश करण्यात आला आहे.' 

चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यावर मोदींनी केली स्वच्छता

आरे जंगलाचा उल्लेख नाही
मुंबईतील आरे कॉलनीतील जंगल वाचवण्या संदर्भात वचननाम्यात उल्लेख नसल्याबद्दल ठाकरे यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, 'आरेचा विषय मुंबई पुरता आहे. आम्ही हा संपूर्ण महाराष्ट्राचा जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत तर, पुढे प्रत्येक विभागानुसार जाहीरनामा देणार आहे. त्यात मुंबईचा वेगळा, मराठवाड्याचा वेगळा, विदर्भाचा वेगळा असेल. त्यात स्थानिक मुद्द्यांचा समावेश असणार आहे.' त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'आरे विषय मुंबईकरांचा आणि सर्व राजकीय पक्षांचा आहे. सर्वांनी या विषयावर आपली भूमिका जाहीर करावी. शिवसेनेने भूमिका जाहीर केली आहे. आम्ही विरोध केला यापुढेही करत राहू.' 

काँग्रेसचे स्टार प्रचारक यादी पुरतेच 

काय आहे वचननाम्यामध्ये?

 1. मुख्यमंत्री शहर सडक योजनेसाठी विशेष निधी
 2. तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी स्वतंत्र केंद्र
 3. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र एसटी बससेवा
 4. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार
 5. पिक विम्यात होणार बदल; नुकसान झालेल्याला भरपाई 
 6. शेतकऱ्यांच्या खात्यात दर वर्षी 10 हजार रुपये
 7. घरगुती वापराची वीज 30 टक्क्यांनी कमी करणार
 8. एक रुपयात आरोग्य चाचणी 
 9. आरोग्य चाचणीत 200 चाचण्या करणार
 10. दहा रुपयांत पोटभर जेवण
 11. प्रत्येक जिल्ह्यात एक सेंट्रलाइजड् किचन
 12. महिला बचत गटाला सामावून घेतले जाईल
 13. महिला सक्षमीकरणावर भर
loading image