Vidhansabha 2019 : शिवसेना, काँग्रेसच्या वर्चस्वाची लढाई

South-Central-Mumbai
South-Central-Mumbai

काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांना हा मतदारसंघ आपलासा वाटतो. लोकसभेतील पराभवाने झालेल्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी काँग्रेस येथे जोर लावणार, यात शंका नाही.

मुंबई शहर आणि उपनगर असा मिश्र असलेला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघात सध्या काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे तीन आणि भाजपचा एक आमदार आहे. 

वडाळा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार केला. यामुळे शेवाळे खूष झाले असले, तरी कोळंबकर यांच्या ‘घरवापसी’मुळे शिवसेनेतील इच्छुक नाराज झाल्याचे चित्र आहे. कोळंबकर यांनी अद्याप अधिकृत पक्षप्रवेश केलेला नाही. त्यांचा कल भाजपकडे दिसतो आहे. मागील विधानसभेप्रमाणे यंदाही युती न झाल्यास कोळंबकर यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेतील दिगंबर कांडरकर, श्रद्धा जाधव वडाळामधून लढण्यास इच्छुक आहेत. माहीम मतदारसंघातून २००९ मध्ये काँग्रेसकडून लढलेले सदा सरवणकर यांचा मनसेचे नितीन सरदेसाई यांनी पराभव केला होता; मात्र २०१४ मध्ये शिवसेनेच्या उमेदवारीवर लढत सरवणकर यांनी सरदेसाई यांचा पराभव केला. ही स्थिती आगामी विधानसभा निवडणुकीत दिसू शकते. धारावी मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड २००४ पासून सलग निवडून येत आहेत.

भाजपने २०१४ मध्ये दिव्या ढोले यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्यासह शिवसेनेचे बाबूराव माने पुन्हा रिंगणात उतरण्यास उत्सुक असतील. सायन कोळीवाडा मतदारसंघात २०१४ मध्ये काँग्रेसच्या जगन्नाथ शेट्टींवर भाजपचे कॅप्टन तमिळ सेल्वन यांनी मात केली. शिवसेना-काँग्रेसमध्ये येथे कायम तुल्यबळ लढती होत असत; मात्र त्यात आता भाजपही वाटेकरी झाल्याने चुरस वाढली आहे. काँग्रेसचे नगरसेवक रवि राजाही उमेदवारीसाठी धडपडत आहेत. मनसेचे बाबा कदम आणि विनोद खोपकर इच्छुक असल्याचे दिसते. चेंबूर मतदारसंघात माजी राज्यमंत्री चंद्रकांत हंडोरे काँग्रेसकडून पुन्हा इच्छुक आहेत. अणुशक्तीनगर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांना आव्हान देण्यासाठी ‘राष्ट्रवादी’चे नेते नवाब मलिक यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून काम सुरू केले आहे. त्यांची मुलगी सना मलिक येथून रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे.

असे आहेत पक्षनिहाय इच्छुक 
शिवसेना - श्रद्धा जाधव, दिगंबर कांडरकर, सदा सरवणकर, मंगेश सातमकर, तुकाराम काते, प्रकाश फातर्पेकर, बाबूराव माने 

भाजप - कालिदास कोळंबकर, मिहिर कोटेचा, प्रसाद लाड, कॅ. तमिळ सेल्वन, दिव्या ढोले 

काँग्रेस - वर्षा गायकवाड, जगन्नाथ शेट्टी, रवि राजा, चंद्रकांत हंडोरे 

राष्ट्रवादी - सना मलिक, नवाब मलिक 

मनसे - नितीन सरदेसाई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com