विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विजय औटी बिनविरोध

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

मुंबई : विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विजय औटी यांची आज (शुक्रवार) बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीच्या शर्यतीत आमदार बच्चू कडू आणि हर्षवर्धन सपकाळ हेदेखील होते. मात्र, या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर विजय औटी यांची निवड झाली. 

विधानसभेचे उपाध्यपद गेल्या चार वर्षांपासून रिक्त होते. त्यासाठी आज मतदान घेण्यात येणार होते. या पदासाठी भाजप-शिवसेनेचे उमेदवार म्हणून औटींनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच विरोधीपक्षांकडून काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्षांचे उमेदवार म्हणून बच्चू कडू यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, मतदानापूर्वीच या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर औटी यांची या पदासाठी निवड करण्यात आली.

दरम्यान, औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

Web Title: Vijay Auti Elected as the Deputy Speaker of the Assembly