Vijay Mallya: विजय मल्ल्याला भारतात यावंच लागणार… नाहीतर याचिकेचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा

Mumbai High Court verdict: मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश: फरार आर्थिक गुन्हेगाराचा दर्जा आव्हान द्यायचा असेल तर विजय मल्ल्याला भारतात प्रत्यक्ष हजर राहावेच लागणार
Vijay Mallya Must Return to India or Face Petition Rejection, Says Bombay High Court

Vijay Mallya Must Return to India or Face Petition Rejection, Says Bombay High Court

esakal

Updated on

मुंबई: आर्थिक गुन्हेगारीच्या आरोपांमध्ये अडकलेल्या व्यावसायिक विजय मल्ल्याला भारतात प्रत्यक्ष हजर राहणे अनिवार्य आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने आज गुरुवारी स्पष्टपणे सांगितले. परदेशात राहून भारतीय न्यायव्यवस्थेच्या कारवाईला रोखण्याचा प्रयत्न करणे शक्य नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. यामुळे मल्ल्यावर दबाव वाढला असून, त्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी न्यायालयाने देशात परतण्याची अट घातली आहे. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना मल्ल्याला त्यांच्या परतण्याच्या इच्छेबाबत स्पष्ट भूमिका घेण्यास सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com