
Who is Devang Dave
esakal
Who is Devang Dave
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावी यासाठी निवडणूक आयोगावर दबाव टाकला आहे. याच दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, निवडणूक आयोगाचा मीडिया हँडलिंगचा भाग भाजपचा कार्यकर्ता देवांग दवे कसा काय सांभाळतो? मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचा दावा करत वडेट्टीवार यांनी निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.