esakal | विक्रमगड़ : कापणीची वेळ..अन पावसाचा खेळ...
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

विक्रमगड़ : कापणीची वेळ..अन पावसाचा खेळ...

sakal_logo
By
अमोल सांबरे

विक्रमगड़ : विक्रमगड़ (Vikramgarh) तालुका व परिसरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सायकाळीच्या सुमारास वारा व विजेच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने धुमाकुल घातला असून परतीच्या पावसाने शेतात कापलेल्या भात पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या विक्रमगड तालुक्यातील शीळ, ओंदे, आपटी, झडपोली, केव, म्हसरोळी, मलवाडा, दादडे, साखरे, कऱ्हे-तलावली, तलवाडा व विविध भागातील भात शेती कापनी साठी तयार झाली असून भात कापनीचा हंगाम जोरात सुरु आहे.

अनेक शेतकऱ्यांनी भात कापुन शेतामध्ये ठेवले आहे. दिवाळीपुर्वी पिवले सोने घरच्या अंगनात किंवा खल्यावर नेऊन ठेवन्याचे स्वप्न बलिराज्यानी बघितले होते मात्र अचानक आलेल्या परतीच्या पावसाने कापलेल्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापलेल्या पीक वाचवण्यासाठी शेतकरी राजाची धावपळ उडाली होती. मात्र कापलेले भात वाचवण्यासाठि चाललेली धडपड अपुरी पडत असून पाच-सहा दिवसापासुन सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकरी रडकुंडीला आले आहेत.

Mumbai

Mumbai

हेही वाचा: मुंबई : मालवणीत महिलांच्या पायाला त्वचारोग

या पावसाने तालुक्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हा पाऊस हिरावून घेतला आहे. परतीचा पाऊस आणखी दोन ते तीन दिवसात थांबला नाही तर कापलेले भात पीक खराब होऊन वर्ष भराची कमाई पाण्यात जाण्याची चिन्हे असल्याची चिंता शेतकऱ्या कडुन व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: पुढच्या वर्षी CSK कडून खेळेन की नाही सांगू शकत नाही- धोनी

या वर्षी परतीच्या पावसाने विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. माझ्या शेतातील कापणीसाठी तयार झालेल्या भात पिक खाली पडल्याने भात पिकाची धूळधाण झाली आहे. वर्ष भराच्या उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे.

-प्रमोद विश्वनाथ पाटील (शेतकरी, आपटी)

गेल्या पाच-सहा दिवस संध्याकाळी येणाऱ्या पाऊस व वाऱ्यामुळे माझ्या शेतातील कापणीस तयार झालेल्या भात पिक खाली पडले असुन मोठे नुकसान झाले असुन 50 टक्के ही भात पिकाचे उत्पादन हाती येणार नाही. मी पिक विमा काढला आहे. परंतु पिका विमा मिळवण्यासाठी निकष खुप कठीण असल्याने शासनाने तातडीने भात पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत दयावी.

-बबन दामोदर सांबरे (शेतकरी, ओंदे)

loading image
go to top