

VileParle Fire Case
ESakal
मुंबई : विलेपार्ले (पश्चिम) येथील शांता भवन इमारतीत मंगळवारी (ता. ११) रात्री लागलेल्या आगीत अडीच वर्षांच्या चिमुरड्यासह २३ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. कपड्यांना इस्त्री करताना ती चालूच राहिल्याने जवळील कपड्यांनी पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचा धूर पसरल्यानंतर चिमुरड्याला वाचविण्यासाठी महिलेने बेडरूममधील स्वच्छतागृहात आसरा घेतला; मात्र तेथे धूर साचल्याने दोघांचाही गुदमरून आणि भाजल्याने मृत्यू झाला.