Liquor Stock Seized : डोंबिवली कोळे गावात गावठी दारूचा साठा जप्त ; दारूसाठी काळ्या गुळाला बाजारात मागणी

डोंबिवली जवळील कोळे गाव हद्दीत मानपाडा पोलिसांच्या गु्न्हे प्रकटीकरण शाखेने रविवारी संध्याकाळी छापा मारला. या दरम्यान दीड लाखाहून अधिक किमतीचा गावठी दारूचा साठा जप्त करत जागीच नष्ट केला गेला.
Liquor Stock Seized
Liquor Stock Seizedsakal

डोंबिवली : डोंबिवली जवळील कोळे गाव हद्दीत मानपाडा पोलिसांच्या गु्न्हे प्रकटीकरण शाखेने रविवारी संध्याकाळी छापा मारला. या दरम्यान दीड लाखाहून अधिक किमतीचा गावठी दारूचा साठा जप्त करत जागीच नष्ट केला गेला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात निलेश पाटील (वय 26) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली, कल्याण जवळील उंबार्ली टेकडी, हेदुटणे, कोळे, मलंग गड डोंगर परिसर, देसई खाडी किनारा भागात गावठी दारू तयार करण्याचे प्रमाण अधिक असते. कोळे गावात समाधान हाॅटेल मागील झाडीमध्ये नीलेश पाटील याने गावठी दारूचा दीड लाखाहून अधिक किमतीची तयार करून ठेवली आहे.

अशी माहिती मानपाडा पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रविवारी संध्याकाळी या भट्टीवर छापा टाकत. तेथील दीड लाखाहून अधिक किमतीची पिंपात साठवून ठेवलेली दारू टिकाव, फावड्यांचे घाव पिंपावर घालून नष्ट केली. घटनास्थळी दारूचा गूळ, नवसागर, पाणी खेचण्यासाठी मशिन आढळून आली. दारू तयार करण्यासाठी दलदलीतील पाणी वापरले जात होते असेही पथकाच्या निदर्शनास आले.

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाने पोलिसांनी नीलेश पाटील याच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदबाने, पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे, हवालदार अनिल घुगे, गणेश भोईर, प्रवीण किनरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांच्या निदर्शनास येऊ नये म्हणून तयार गावठी दारू रात्रीच्या वेळेत महागड्या गाड्यांमधून शहरी भागात विक्रीसाठी आणली जाते. डोंबिवली, कल्याण परिसरातील डोंंगर, टेकड्यांवर गर्द झाडीत रात्रीच्या वेळेत दारू भट्ट्या लावण्यासाठी दारू उत्पादकांची लगबग सुरू असते. बाजारातून काळा गूळ खरेदीला मागणी वाढली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या कालावधीत झोपडपट्टी भागात दारू मोफत वाटून मतदारांना आपल्याकडे ओढण्याचे प्रकार सर्रास केले जातात. निवडणुकीच्या काळात दारूची अधिक प्रमाणात चढ्या दराने विक्री होते. याची जाणीव असल्याने दारू उत्पादक गाव परिसरातील जंगलात, अडगळीच्या जागेत रात्रीच्या वेळेत गावठी दारू तयार करण्यासाठी भट्ट्या लावतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com