#WednesdayMotivation : संपूर्ण गाव अवयवदान करणार

The village will donate organs
The village will donate organs

कर्जत : अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान ठरत आहेत. त्यामुळेच अनेक जण त्यासाठी पुढे येत आहेत. परंतु त्या पेक्षाही एक पाऊल पुढे टाकत कर्जत तालुक्‍यातील कशेळे ग्रामपंचायतीने एकमताने अवयवदानाचा ठराव आज झालेल्या ग्रामसभेत संमत केला आहे. आधुनिक विचारांची ही मंगलयात्रा एवढ्यावच थांबली नाही. गावाने विवाहपुर्व एडस निदान चाचणी करण्याचाही ठराव केला आहे. 

कशेळे ग्रामपंचायतची सभा हनुमान मंदिरात झाली. सभेच्या अध्यक्षस्तानी उपसरपंच आत्माराम खंडागळे होते. या वेळी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. समाजसेवक हरेश राणे यांनी मृत्यूनंतर देहदान करावे, असे आवाहन केले. "मृत्यूनंतर अवयव जळून त्यांची राख होते. त्या ऐवजी देहदान केले तर प्रत्येक अवयव एखाद्या व्यक्तीला जीवदान देणारे ठरते. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे राणे यांनी सांगितले. 
त्यांचे हे म्हणणे उपस्थित ग्रामस्थानाही पटले. त्यामुळे त्यांनी संकल्पनेला मान्यता देऊन ठराव एकमताने संमत केला. 

सरपंच हर्षला राणे यांनी अवयव दानाचा पहिला फॉर्म भरणार आहेत. त्यानंतर ग्रामस्थ फॉर्म भरून देहादनाचा फॉर्म भरणार आहेत. 
गावातील तरुण- तरुणींनी विवाह पूर्वी एड्‌स चाचणी करण्याचा ठराव मांडण्यात आला. तो एकमताने संमत करण्यात आला. 

या वेळी तंटामुक्ती अध्यक्षपदी सदानंद मते यांची, तर उपाध्यक्ष पदी छगन ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली. सभेस जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तानाजी मते, तुकाराम पाटील, जयराम हरपुडे, गणपत मते, स्वप्नील मते, रमेश मते, अमोल पाटील, रुपेश हरपुडे, सचिन राणे, जनार्दन खंडागळे उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com