ऑनलाईन व्यवहार ही भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 एप्रिल 2017

मुंबई : देशातील वर्षानुवर्षे चालणारा भ्रष्ट कारभार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व व्यवहार ऑनलाईन आणि कॅशलेस पद्धतीने सुरू केले. देशातील भ्रष्टाचार थांबविण्याचा हा प्रयत्न आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधातील ही लढाई म्हणजे ऑनलाईन व्यवहाराची सुरुवात आहे, असे मत शिक्षणमंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी आज केले. 

केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या वतीने देशभरात सुरू करण्यात आलेल्या 100 दिवसांच्या डिजीधन मेळाव्याचा समारोप तावडे यांच्या उपस्थितीत वांद्रे-पूर्व येथील चेतना महाविद्यालयात करण्यात आला. या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते. 

तावडे म्हणाले की देशातील काळे व्यवहार पूर्णपणे बंद करण्याच्या उद्देशाने डिजिटल पेमेंट ही योजना सुरू करण्यात आली असून, सामान्य माणसाला त्याचा फायदा मिळत आहे. डिजिटल व्यवहाराद्वारे प्रत्येक नागरिकाचे व्यवहार हे अधिक सुरक्षित आणि पारदर्शक ठरणार आहेत. 
या प्रसंगी डिजीधन योजनेंतर्गत लक्की ग्राहक योजना व डिजीधन व्यापार योजना यामध्ये निवडलेल्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्लोगन व लघुकविता स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Vinod Tawde bats for increasing online transactions