
IPhone 17 Viral Video
ESakal
मुंबई : भारतातील बहुप्रतीक्षित फोन लाँचमध्ये शुक्रवारी (१९ सप्टेंबर) रोजी अॅपलचा आयफोन १७ सिरीज लाँच झाली आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली येथील अॅपल स्टोअर्सबाहेर पहाटेपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक दुकानांबाहेर ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या असून मुंबईत अॅपल स्टोअरमध्ये काही तरुणांची हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.