

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर बाईक चालवून एका वाहतूक अधिकाऱ्याला शिवीगाळ, धमकी आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलिसांनी २६ वर्षीय आर्किटेक्टविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ट्रॅफिक अधिका-यांसोबत महिलेच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ही महिला वांद्रे वरळी सी लिंकवरून वेगाने, आपल्या बाईकवरुन जात असताना पोलिसांनी अडवलं. पण त्यानंतर ही महिला पोलिसांसोबत हुज्जत घालताना दिसत आहे.
"नरेंद्र मोदींनी मला फोन करून माझी बाईक बंद करायला सांगितली तर मी ते करेन. जा मोदींना फोन करा.", असंही ही महिला या पोलिस अधिकाऱ्याला म्हणाली. अधिकाऱ्याने तिला ओढून घेण्याचा प्रयत्न केल्यावर ती त्याला शिवीगाळ करते आणि म्हणते, “मी तुझा हात कापून टाकीन. माझ्या बाईकवर हात ठेवण्याची हिम्मत कशी झाली."
पोलिसांनी सांगितलं की, त्यांना वांद्रे-वरळी सी लिंक सुरक्षा कर्मचार्यांकडून फोन आला की नुपूर मुकेश पटेल नावाची एक महिला सी लिंकवर तिची बुलेट चालवत दक्षिण मुंबईच्या दिशेने जात आहे.
“जेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला थांबवलं तेव्हा तिने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि सांगितलं की ती रस्त्याचा टॅक्स भरते, त्यामुळे हा रस्ता तिचा पण आहे आणि त्यामुळे तिला कोणीही रोखू शकत नाही. अनेक विनंत्या करूनही, ती तिची दुचाकी रस्त्याच्या एका बाजूला घेण्यास तयार नव्हती आणि वाहतूक पोलिसांशी वाद घालत होती,” एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
"ती अनावश्यक वादात पडली आणि एका हवालदाराला धक्काबुक्कीही केली," अधिकाऱ्याने सांगितलं की, तिच्यावर अडथळा आणणं, निष्काळजीपणे वाहन चालवणं आणि सार्वजनिक सेवकावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पटेल मध्य प्रदेशातील जबलपूर इथली रहिवासी आहे. तिला फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम 41A अंतर्गत तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली आणि तिला जाण्याची परवानगी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.