
PETA Viral Video
ESakal
मुंबई : मागील काही महिन्यांपासून राज्यात कबुतरांविषयी वाद उफाळला आहे. कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्यामुळे प्रशासनाने कबुतरखाने बंद केले आहेत. तसेच कबुतरांना खाऊ घालू नये असे आवाहन केले आहे. मात्र पक्षीप्रेमींकडून प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध केला जात आहे. पेटा इंडिया देखील या निर्णयाच्या विरोधात असून याबाबत एक व्हिडिओ व्हायरल करत अनोखं आंदोलन केलं आहे.