बोनेटवर बसून स्टंटबाजी अंगलट; VIDEO व्हायरल झाल्यानंतर दोघांना अटक

ही सोमवारी रात्री उशिरा घडली असून वांद्रे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
video
videoesakal

मुंबई - सोशल मिडियावरून (Social Video) आपण दररोज कितीतरी घटना पाहत आणि वाचत असतो. अनेक वेगळे आणि विचित्र फोटो किंवा काही थरारत व्हिडिओ येथे पोस्ट होत असतात. दरम्यान आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरात जीव धोक्यात घालून गाडी चालवणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल (Video Viral) होत आहे.

video
नितेश राणेंना अटक झाल्याशिवाय जामीन मिळणार नाही; अनिल परब

या व्हिडिओत एक तरुण चाल्या गाडीच्या चक्क बोनटवर बसला असून चालक गाडी वेगात चालवताना दिसत आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी गाडीच्या नंबर पडताळून दोघांवर कारवाई केली आहे. मोहम्मद गुलफाम अन्सारी (वय २५), मोहम्मद इम्रान अन्सारी (वय २७) अशी या दोघांची नावे आहेत. या घटनेतील दोन्ही आरोपी कुर्ला परिसरात राहणारे असून एका खासगी कंपनीत कामाला आहेत. ही सोमवारी रात्री उशिरा घडली असून वांद्रे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

दरम्यान, अशा अनेक घटना आपण सोशल मिडियावर वारंवार पाहत असतो. चारचाकी, दुचाकीसोबत असे स्टंट करणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र असे जीवघेणे स्टंट करणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे यांना वेळीच आवर घालणे गरजेचे असल्याने पोलिसीह यावर योग्य ती कारवाई करत असतात.

video
नितेश राणेंना अटक झाल्याशिवाय जामीन मिळणार नाही; अनिल परब

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com