
नितेश राणेंना अटक झाल्याशिवाय जामीन मिळणार नाही; अनिल परब
सिंधुदुर्ग:शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा नियमित जामीन अर्ज आज जिल्हा न्यायालयात नामंजूर केला. या निर्णया विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, असे त्यांचे वकील सतीश मानशिंदे यांनी सांगितले. यावर शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी राणेंना अटक झाल्याशिवाय जामीन मिळणार नाही असे वकिली भाषेत उत्तर दिले. मुंबईत आज ते बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन आज फेटाळला. हा जामीन अर्ज फेटाळताना त्यांना १० दिवसाच्या आत शरण येण्यास सांगितलं होतं. ते कोर्टात गेले परंतु त्यांनी शरणागती पत्करली नाही. किंवा कुठल्याही प्रकारचा सरेंडर होण्याचा अर्ज केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता की तुम्ही शरण या. जोपर्यंत तुम्ही शरण होत नाही तोपर्यंत जामीन अर्जासाठी पात्र होत नाही. कारण त्यांचा बेल रिजेक्ट झाला होता. त्यामुळे अटकपूर्व जामीन अमान्य झाला.
हेही वाचा: सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर हायव्होलटेज ड्रामा; निलेश राणे-पोलिसांमध्ये बाचाबाची
जामीनासाठी अर्ज करण्यासाठी पहिला अटक व्हावी लागते आणि म्हणून जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत त्यांचा जामीन होत नाही. या कारणास्तव सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता ते हायकोर्टात जातील कुठे जरी गेले तरी त्यांना पहिलं स्वतःला सरेंडर करावं लागेल. ते जेव्हा सरेंडर होतील तेव्हाच त्यांना जामीन मिळेल. यासाठीच सुप्रीम कोर्टाने त्यांना १० दिवसांची मुदत दिली होती. आता हा मुद्दा कायदेशीर आहे, तज्ञ त्याच्यावरती विचार करतील.
एखाद्या व्यक्तीला जीवानिशी मारणे हा फार मोठा गुन्हा आहे. सगळ्यात मोठा गुन्हा ३०२ असतो. म्हणजे माणसाला पूर्ण जीवानिशी मारून टाकणे आणि त्यानंतरचा गुन्हा ३०७ असतो. त्याला कायद्यामध्ये फार मोठी शिक्षा आहे. अशा प्रकारचा गुन्हा त्यांच्याकडून झालेला आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त जी शिक्षा असते ती मिळेल असे ही परब म्हणाले.
Web Title: Bjp Mla Nitesh Rane Bail Talks Minister Anil Parab Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..