

Virar Fire
ESakal
मुंबई : मुंबईत विरार येथे काही दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जवळपास ७ ते ८ दुकानांच्या गाळ्यांना सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानांमधील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आगीचे कारण अद्याप समोर आले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.