नालासोपारा : विरारच्या अर्नाळा किल्ल्याच्या समुद्र किनाऱ्यावर महिला आणि पुरुषाचे दोन मृतदेह आज रविवार ता 29 रोजी सकाळी आढळले होते. अर्नाळा पोलिसांनी या दोन्ही मृतदेहाला ताब्यात घेऊन शवविच्छेदन साठी पाठवून तपास केला असता सापडलेले मृतदेह हे पती पत्नीचे असून, त्यांनी दोघांनी एकत्र आत्महत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मात्र ही आत्महत्या का आणि कशासाठी केली याचे कारण स्पष्ट झाले नसून, याचा तपास सुरू असल्याची माहिती अर्नाळाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी दिली आहे.