...'हे' नाट्यगृह झालंय स्मार्ट!

नवी मुंबईतील 'हे' नाट्यगृह झालंय स्मार्ट!
नवी मुंबईतील 'हे' नाट्यगृह झालंय स्मार्ट!
Updated on

नवी मुंबई : वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाचे 12 कोटी 79 लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिकेचे हे एकमेव नाट्यगृह असून, नूतनीकरणानंतर नुकताच कॉन्टॅक्‍ट लेन्स या नाटकाचा पहिला प्रयोग येथे झाला. या वेळी नवी मुंबईकर नाट्यप्रेमींनी बदललेले रूपडे पाहून पालिकेचे कौतुक केले. 

नवी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी वाशी सेक्‍टर 16 येथे सिडकोने 1993 मध्ये 16 कोटी रुपये खर्च करून भावे नाट्यगृह उभारले. पालिकेने जून 1996 मध्ये हे नाट्यगृह स्वत:कडे हस्तांतरित करून घेतले. यात नाटक, राजकीय व सामाजिक संस्थांचे कार्यक्रम, शाळेचे स्नेहसंमेलन असे कार्यक्रम होतात; मात्र हस्तांतरण झाले तेव्हापासून या नाट्यगृहाची म्हणावी तशी दुरुस्ती झाली नाही. अनेक कलावंत, नाट्य व नृत्यप्रेमींनी, नागरिकांनी ध्वनियंत्रणेपासून ते इतर सुविधांबाबत नाराजी व्यक्त करत नूतनीकरणाची मागणी उचलून धरली होती. त्यानुसार मार्च 2019 मध्ये नूतनीकरणाचा नारळ फुटला. मार्च 2019 मध्ये सुरू झालेले अंतर्गत नूतनीकरणाचे काम तब्बल 10 महिन्यांनी पूर्ण झाले. 1 जानेवारी 2020 मध्ये नवीन वर्षाचा मुहूर्त साधत आणि नवी मुंबई महापालिकेच्या 28 व्या वर्धापनदिनाचा मुहूर्त साधत हे नाट्यगृह कलाकार आणि नाट्यप्रेमींकरिता खुले झाले आहे. नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यात बाहेरील नूतनीकरणाची कामे केली जाणार आहेत. 

हे बदल झाले 
नूतनीकरणानंतर भावे नाट्यगृहात देखणा बदल झाला आहे. आधुनिक प्रकारची व्ही. आर. व्ही. वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटगृहात असणारा पडदा, ध्वनी यंत्रणा व प्रकाश व्यवस्थेचे अत्याधुनिकीकरण, कलावंत खोल्या व कार्यालयाचे आधुनिकीकरण करण्यात आले असून, नवीन फोमची आसनव्यवस्था, मखमली कार्पेट टाकण्यात आले आहे. प्रवेश लॉबीचे नूतनीकरण, क्राय रूमचे नूतनीकरण, कला प्रदर्शन दालन, आकर्षक रंगसंगती व रोषणाईने रंगमंच व प्रेक्षागृह सजवण्यात आले आहे. रंगमंचाच्या कमानीवर भावे नाट्यगृहाचा डिजिटल फलक बसवण्यात आला आहे. 

कलावंत, अतिथींकरिता एलईडी टीव्ही 
विशेष म्हणजे महिला व पुरुष कलावंत यांना रंगमंचावर कोणते दृश्‍य सुरू आहे, आपला प्रवेश कधी झाला याची माहिती मिळावी याकरिता मेकअप खोलीमध्ये आणि अतिथी कक्षात बसलेल्यांना रंगमचावरील कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा याकरिता त्या ठिकाणी एलईडी टीव्ही बसवण्यात आले आहेत. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे भावे हे राज्यातील एकमेव नाट्यगृह ठरले आहे. 

सीसीटीव्हीचा पहारा 
नाट्यगृहातील मुख्य प्रवेशद्वार आणि बाहेर जाणाऱ्या द्वारावर झुमिंग सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत; तर इतर ठिकाणी लक्ष ठेवण्याकरिता सीसीटीव्ही कार्यरत झाले आहेत. 

भावे नाट्यगृहात गोष्ट तशी गमतीची या नाटकाचे हाऊसफुल प्रयोग केले आहेत. चोखंदळ प्रेक्षक असतानासुद्धा नाट्यगृह स्वच्छ नव्हते. याची खंत मनात होती, पण आता नूतनीकरणानंतर खूप बदल झाल्याने भारावलो आहे. मेकअप खोलीचा बदल तेथील कलाकारांकरिता टीव्ही, ध्वनियंत्रणा, व्यासपीठ चांगला तयार करण्यात आहे. या चांगल्या कामाबदल पालिकेचे आभार. स्वच्छतागृह सुधारणे आवश्‍यक असून, प्राथमिक उपचार सुविधा सुरू करावी. 
- शशांक केतकर, सिने व नाट्य कलाकार. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com