मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असतानाच बेळगाव, कारवार, निपाणीच्या घोषणा; शिंदे म्हणाले...: Vishwa Marathi Sammelan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm eknath shinde

Vishwa Marathi Sammelan: मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असतानाच बेळगाव, कारवार, निपाणीच्या घोषणा; शिंदे म्हणाले...

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सीमाभागातील गावांचा विषय बराच ऐरणीवर आला आहे. याचे पडसाद मुंबईत सुरु असलेल्या विश्व साहित्य संमेलनातही पहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु असताना सभागृहात बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली. यामुळं क्षणभर भाषण थांबवून मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्यही केलं. (Vishwa Marathi Sammelan announcements of Belgaum Karwar Nipani while CM speech)

हेही वाचा: Devendra Fadnavis : अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण मराठीतून; फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबईतील मराठी माणूस आणि मराठी भाषा यावर मुख्यमंत्री बोलत असताना अचानक सभागृहात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील गावांवरुन घोषणाबाजी सुरु केली. "बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" अशा घोषणा यावेळी दिल्या गेल्या. यामुळं मुख्यमंत्री क्षणभर थांबले आणि म्हणाले, यासाठी सरकार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री दोघेही दिल्लीला गेलो होतो. यावेळी गृहमंत्र्यांनी पहिल्यांदा या विषयावर हस्तक्षेप केला, ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे.

हेही वाचा: Vishwa Marathi Sammelan: मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असतानाच बेळगाव, कारवार, निपाणीच्या घोषणा; शिंदे म्हणाले...

मुंबईत मराठी टक्का कायम रहावा यासाठी प्रयत्न सुरु

मुंबईसह महाराष्ट्र मिळवताना १०६ जणांनी बलिदान दिलं याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळं मुंबईत मराठी भाषेची, मराठी भाषिकांची पिछेहाट होणार नाही. मुंबईत मराठी ठसा आणि मराठी टक्का कायम राहावा यासाठी देखील आमच्या सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंबईत मराठी माणसाला पुन्हा आणण्यासाठी कायदे बदलणार

सरकारच्या माध्यमातून मी बोलू इच्छितो की, मराठी माणूस मुंबईतून बाहेर जाता कामा नये. पण जो मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला त्याला पुन्हा मुंबईत परत आणण्यासाठी यासाठी देखील पुनर्विकासाचे प्रकल्प जे थांबलेले आहेत त्यासाठी नियम कायदे बलण्यास सरकार तयार आहे, हे मी सांगू इच्छितो.