पालघरमध्ये इजिप्शियन गिधाडाचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

विरार ः महाराष्ट्रात पूर्वी मोठ्या प्रमाणात गिधाडे आढळत होती; परंतु अलीकडे त्यांची संख्या खूपच कमी झाली असून राज्यातील तुरळक ठिकाणीच आता ती दिसतात. झपाट्याने नामशेष होणाऱ्या पक्ष्यांमध्ये गिधाडांची संख्या मोठी आहे. गिधाडांच्या अनेक प्रजाती असून त्यातील इजिप्शियन गिधाडांचे पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील माकुणसार येथे दर्शन झाल्याने पक्षीमित्रांनी आनंद व्यक्त केला आहे. 

विरार ः महाराष्ट्रात पूर्वी मोठ्या प्रमाणात गिधाडे आढळत होती; परंतु अलीकडे त्यांची संख्या खूपच कमी झाली असून राज्यातील तुरळक ठिकाणीच आता ती दिसतात. झपाट्याने नामशेष होणाऱ्या पक्ष्यांमध्ये गिधाडांची संख्या मोठी आहे. गिधाडांच्या अनेक प्रजाती असून त्यातील इजिप्शियन गिधाडांचे पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील माकुणसार येथे दर्शन झाल्याने पक्षीमित्रांनी आनंद व्यक्त केला आहे. 

 मुंबई ते पुण्यादरम्यान ३० तारखेपर्यंत कोयना एक्सप्रेस रद्द...

एकेकाळी ग्रामीण भागात गिधाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसायची. त्याला कारणेही होती, पूर्वी गावच्या ठिकाणी गुरे-ढोरे मोठ्या प्रमाणावर असायची. मेलेल्या गुरा-ढोरांवर; तसेच काही ठिकाणी पारशी लोकांच्या अग्यारी असल्याने गिधाडांना त्यांचे खाद्य मिळायचे; परंतु आता गावपण जाऊन शहरीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याने गुराढोरांची संख्याही कमी झाली असून एकेकाळी डहाणू तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात असलेला पारशी समाजही कमी झाला असल्याने अग्यारीत टाकण्यात येणारी प्रेतेही कमी झाल्याने गिधाडांवर उपासमारीची वेळ आल्याने या भागात गिधाडांची संख्या कमी झाली.

कोट्यवधी रुपये पाण्यात, चहूूबाजूंनी रहिवाशी इमारत...

भारतात यापूर्वी लाखांच्या घरात गिधाडे आढळून येत होती; परंतु आता मात्र त्याचे प्रमाण काही हजारांवर आले आहे. भारतात गिधाडांच्या नऊ प्रजाती आढळत असून त्यापैकी बंगाली गिधाड, लांब चोचीचे गिधाड आणि बारक्‍या चोचीचे गिधाड या प्रजाती धोकादायक प्रजाती म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या प्रजातीची संख्या ९९ टक्के कमी झाल्याचे समोर आले आहे. 

इजिप्शियन गिधाड हे भारतीय निवासी असून ईशान्य भारत वगळता इतरत्र आढळतात. अत्यल्प संख्येमुळे त्यांचे दर्शन फार कमी वेळा होते. भारतातील गिधाडांच्या प्रजातीतील आकाराने लहान असलेल्या या गिधाडाला जगातील संकटग्रस्त प्रजातीत समाविष्ट करण्यात आल्याचे पक्षीमित्र सचिन मेन यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

पाणथळ भागात घिरट्या
एका बाजूला गिधाडांचे दर्शन दुर्लभ झाले असताना सफाळे आणि माकुणसार या ठिकाणी इजिप्शियन गिधाडांचे दर्शन झाले आहे. या गावाजवळील पाणथळ भागामध्ये स्थानिक पक्षीमित्र श्रीधर गव्हाणे आणि प्रीतम घरत यांना गिधाड आकाशात घिरट्या घालत असल्याचे दिसले. त्यानंतरही तीन दिवस हे गिधाड या भागात दिसले. यामुळे पक्षिमित्रांनी आनंद व्यक्त केला आहे.

गिधाडांना लागणारे त्यांचे अन्न कमी झाल्यामुळे त्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. सध्या या ठिकाणी मेलेल्या ढोरांचे अन्न गिधाडांना मिळाल्याने या गिधाडांचे दर्शन आम्हाला झाले असावे, असे दिसते. 
विवेक राऊत, 
रहिवासी, माकुणसार  

वाढत्या शहरीकरणामुळे गिधाडांना त्यांचे अन्न मिळणे बंद झाले असून दुसऱ्या बाजूला  पर्यावरणात होणाऱ्या बदलामुळे गिधाडे शहरापासून लांब गेली आहेत. अन्नाअभावी त्याचा परिणाम त्यांच्या संख्येवरही झाला आहे. गिधाडे वाचवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. 
सचिन मेन, पक्षीमित्र आणि लेखक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Visit of an Egyptian vulture to Palghar near Mumbai