Vistara Air : कपडे काढले, एअर होस्टेसला मारहाण; मुंबईला येणाऱ्या 'विस्तारा'त महिलेचा गोंधळ

काही दिवसांपूर्वी महिलासह प्रवाशावर लघुशंका केल्याचा प्रकार ताजा असतातानाच आता पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे.
Vistara-Airlines
Vistara-AirlinesSakal

Vistara Airlines : काही दिवसांपूर्वी महिलासह प्रवाशावर लघुशंका केल्याचा प्रकार ताजा असतातानाच आता पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे. (Woman abuses crew, walks semi-nude on Abu Dhabi-Mumbai flight )

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

एका ४५ वर्षीय महिलेने क्रू मेंबरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अबुधाबीहून मुंबईला येणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात घडली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका इटालियन महिलेला अटक केली. नंतर संबंधित महिलेला २५ हजारांच्या दंडात्मक रकेमेवर जामिन देण्यात आला आहे.

Vistara-Airlines
Air India Urination Case : DGCAचा पुन्हा एअर इंडियाला दणका! ठोठावला 10 लाखांचा दंड

याबाबत अधिक माहिती अशी की, एअर विस्तारा फ्लाइट यूके २५६ सोमवारी दोन वाजून तीन मिनिटांनी अबूधाबी विमानतळावरुन विमानानं मुंबईसाठी उड्डाण घेतलं होतं. पाओला पेरुसिओ ही ४५ वर्षीय महिला अबुधाबीहून मुंबईकडे येणाऱ्या विस्तारा एअरलाईन्स विमानाने प्रवास करत होती.

पाओलाकडे इकॉनॉमी क्लासचे तिकीट होते. तरीही तिने बिझनेस क्लासमध्ये बसण्याचा आग्रह धरला. याला विरोध केल्यानंतर संबंधित महिलेने क्रू मेंबरच्या तोंडावर बुक्का मारला. एवढ्यावरच न थांबता या महिलेने हद्द पार करत अंगावारील काही कपडे काढले.

Vistara-Airlines
Air India Urination Case : लघुशंकाप्रकरणी टाटांच्या एअर इंडियावर DGCA ची मोठी कारवाई

संबंधित महिला हे कृत्य करत असताना दारूच्या नशेत होती असे सहार पोलिसांनी सांगितले. घटनेवेळी इतर उपस्थित क्रू मेंबर्सने संबंधित महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने क्रू मेंबरवर थुंकले तसेच अंगावरील कपडे काढत अर्धनग्न अवस्थेत विमानात फिरू लागली.

विमान मुंबई विमानतळावर लँड झाल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर या महिलेला अटक करण्यात आली.

Vistara-Airlines
Air India : विमानात महिलेच्या अंगावर लघवी, आरोपीवर चार महिन्यांची बंदी; वकील म्हणाले, माझा क्लायंट..

पेरुसिओच्या वैद्यकीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात ही महिला प्रवासादरम्यान दारूच्या नशेत होती असे दिसून आले आहे, या प्रकरणी संबंधित महिलेला न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठोठावत जामीन मंजूर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com