लोकलमधील गर्दीतील चोरट्यांना लगाम!

वडाळा स्थानकात प्रवाशांची तपासणी करताना रेल्वे पोलिस.
वडाळा स्थानकात प्रवाशांची तपासणी करताना रेल्वे पोलिस.

मुंबई  : रेल्वेच्या हार्बर मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या वेळी आपले फोन व इतर मौल्यवान वस्तू सांभाळताना प्रवाशांच्या नाकीनऊ येतात. याचाच फायदा घेत चोर प्रवाशांच्या वस्तू सर्रास लंपास करत असल्याचे आढळून येत आहे. यावर आळा घालण्याकरिता रेल्वेचे नवनियुक्त पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी स्थानकात गर्दीच्या वेळी व्हिजिबल पोलिसिंग व घातपात चेकिंग मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत वडाळा रोड रेल्वेस्थानकात सोमवारी (ता. २९) रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम राबवली.

स्थानकांत गर्दीच्या वेळी होणाऱ्या चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. याअंतर्गत दररोज सकाळी व संध्याकाळी रेल्वे आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह आपापल्या हद्दीतील फलाटांवर व्हिजिबल पोलिसिंग व घातपात विरोधी तपासणी करतील. यादरम्यान लोकलमधून उतरणारे व स्थानकावर वावरणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाईल. मोहिमेमुळे ऐन गर्दीच्या वेळेस घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये घट होण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काटेकोरपणे ही योजना राबवली जात आहे. याअंतर्गत वडाळा रेल्वे पोलिस ठाणे हद्दीतील इतर स्थानकांवरही टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविण्यात येईल.
- राजेंद्र पाल, वरिष्ठ रेल्वे पोलिस निरीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com