विठाबाईंचे जीवन मार्गदर्शक - ऊर्मिला कानिटकर 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 जानेवारी 2017

मुंबई - विठाबाईंचा खडतर जीवनप्रवास हा प्रत्येक कलावंताला मार्गदर्शक ठरणारा आहे. अशा विठाबाईंची भूमिका साकारायला मिळणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान होते, अशी भावना "विठा' या मराठी चित्रपटात विठाबाईंची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर-कोठारे हिने व्यक्त केली. 

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या पंधराव्या स्मृतिदिनी झालेल्या अभिवादन सभेत ती बोलत होती. "विठा' या चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले आहे. ऊर्मिलाबरोबरच उपेंद्र लिमये यांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाची कथा विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर आणि विठाबाईंची मुले विजय, कैलास व राजेश नारायणगावकर व त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून तयार करण्यात आली आहे.

Web Title: Vithabai life guide - urmila kanitkar