उल्हासनगर : अल्पवयीन निघाला सराईत मोटारसायकल चोर; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Bike Robbery
Bike Robberysakal media

उल्हासनगर : विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून पाच मोटरसायकल चोरणाऱ्या (Bike Robbery) सराईत चोरट्याला ताब्यात घेण्यात आले आहे; तर या गाड्या विक्री करणाऱ्या आरोपीलाही विठ्ठलवाडी पोलिसांनी (Vitthalwadi police) गजाआड केले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. उल्हासनगर आणि परिसरात मोटरसायकल चोरीच्या घटना (Robbery crime) वाढल्या आहेत. विठ्ठलवाडीच्या हद्दीतून चोरी केलेली गाडी अंबरनाथमध्ये विकण्यासाठी येत आहे, अशी माहिती विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती.

Bike Robbery
मुंबई : मढ जेटी परिसरातील पाणीचिंता मिटली; नवीन जलवाहिनीचे काम सुरु

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने अंबरनाथमधील चिंपचाडा परिसरात सापळा रचला. या कारवाईत अल्पवयीन मुलासह आफताब शेख याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मुलाने या सर्व गाड्या चोरल्याचे समोर आले.

तर आफताब या गाड्यांची विक्री करणार होता. या दोघांनी लपवून ठेवलेल्या मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या. अल्पवयीन मुलावर विविध पोलिस ठाण्यांत मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com