भारतीय व्हिसा असल्याने कुलभूषण गुप्तहेर कसे?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

मुंबई : कुलभूषण जाधव यांच्याकडे भारतीय व्हिसा असताना ते गुप्तहेर कसे ठरू शकतात, असा सवाल देशाचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री निवृत्त जनरल डॉ. व्ही. के. सिंग यांनी केला. वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सिंग यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला. 

माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कुलभूषण यांच्याकडे भारत सरकारचा योग्य पासपोर्ट आणि व्हिसा असताना ते गुप्तहेर कसे ठरतात, असा सवाल त्यांनी विचारला. प्रत्येक भारतीयाची सुरक्षा सुनिश्‍चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे.

जगभरात असलेल्या कुठल्याही नागरिकाच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक ती पावले उचलण्यात येतील, असे सिंग म्हणाले. 

मार्च 2016 मध्ये कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर म्हणून अटक करण्यात आली होती. त्यांना पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे.

Web Title: VK Singh questions Pakistan's stance on Kulbhushan Jadhav