व्होकल कोरोना टेस्टिंगला गती, एका महिन्यात गोळा केले 1400 आवाजाचे नमुने

भाग्यश्री भुवड 
Friday, 9 October 2020

येत्या आठ दिवसात 2 हजार नमुने तपासणीचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट 

मुंबई : कोरोना निदान करण्यासाठी आवाज नमुन्यांचा पर्यायही हाताळला जाणार आहे. यासाठी नेसको जंम्बो कोविड सेंटर मध्ये रुग्णांच्या आवाजाचे नमुने घेण्यास सप्टेंबर महिन्यापासून सुरुवात झाली आहे. गेल्या महिना भरात आतापर्यंत जवळपास 1400 आवाजाचे नमुने गोळा करण्यात आले असल्याची माहिती जंम्बो कोविड सेंटर अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्राडे यांनी दिली आहे. येथून 2 हजार आवाज नमुने तपासले जाणार असून येत्या आठ दिवसांत हे उद्दिष्ट देखील पूर्ण करण्यात येईल अशी माहितीही देण्यात आली आहे. 

बुधवारी सायंकाळपर्यंत 1350 आवाजाचे नमुने घेण्यात आले होते. दर दिवशी 50 ते 52 आवाजाचे नमुने गोळा करण्यात येत आहेत. त्यानुसार, गुरुवारी आवाजाच्या नमुन्यांची संख्या 1400 वर पोहचली होती. यातील  300 जणांचा रिपोर्ट देण्यात आला आहे. तर, आगामी काही दिवसात 500 आवाजांचे केस रिपोर्ट देण्यात येतील.

5 सप्टेंबरपासून आवाजाचे नमुने घेण्यास सुरुवात झाली आहे. महिन्याभराच्या कालावधीत 1400 नमुने गोळा करण्यात असून यातील एका रुग्णाची माहिती घेण्यास सुमारे 20 मिनिटांचा कालावधी लागत आहेत.  यासाठी दोन जनाची टीम काम करत असल्याची माहिती डॉ आंद्राडे यांनी दिली. दरम्यान, आवाजाचा एकंदरीत अहवाल येण्यास किमान चार महिने लागतील. त्यानंतरच ही पद्धत उपयुक्त आहे का हे समजेल असे ही डॉ. आंद्राडे यांनी स्पष्ट केले आहे. 

सर्वात मोठी बातमी : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात CBI करणार नव्याने तपास, दुसरं पथक मुंबईत दाखल

हा अभ्यास शरीरातील श्वसन आणि संवाद प्रणालींमधील परस्पर संबंधाने संसर्ग व्यक्तींच्या आवाजावर परिणाम करू शकतो यावर आधारित आहे. हा प्रकल्प सध्या प्रायोगिक तत्वावर आधारित आहे.  कोविड -19 रूग्णांना ओळखण्यासाठी व्हॉईस बायोमार्कर्सचा वापर पहिल्यांदयाच केला आहे. तंत्रातील परिणामकारकता मोजून योग्य निदान समोर येण्यासाठी किमान चार महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे डॉ. नीलम अंद्राडे यांनी स्पष्ट केले आहे. 

डायलिसीसची ही सुविधा - 

नेस्को जम्बो कोविड सेंटरमध्ये पुढील आठवड्यात डायलेसिसच ही सुविधा सुरु करण्यात येत असून त्यासाठी नेफ्रॉलॉजी तज्ज्ञ आणि आवश्यक सहकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.

( संपादन - सुमित बागुल ) 

vocal corona testing catches momentum in mumbai 1400 samples collected


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vocal corona testing catches momentum in mumbai 1400 samples collected