Vodafone-Idea ची मोठी घोषणा, JIO नंतर उचललं मोठं पाऊल..

Vodafone-Idea ची मोठी घोषणा, JIO नंतर उचललं मोठं पाऊल..

Vodafone-Idea ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. Vodafone-Idea ने एक डिसेंबर पासून आपले टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतलाय. नुकतंच JIO ने देखील नॉन जिओ कॉलिंग साठी पैसे आकारण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, Vodafone-Idea ची सध्याची स्थिती बिकट आहे. मागच्या तिमाहीत या कंपनीला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागलंय.  

दूरसंचार कंपनी Vodafone Idea ला दुसऱ्या तिमाहीत तब्बल  50,921 करोड चं नुकसान झालंय. Vodafone चं आतापर्यंतचं हे सर्वाधिक नुकसान आहे.  सरकारकडून AGR म्हणजेच  'एडजस्टेड ग्रॉस रेवेन्यू'  वसूल केला जातोय. यामुळे  Vodafone Idea वर प्रचंड आर्थिक ताण पडलाय.  

सुप्रीम कोर्टाने 24 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्णयात दूरसंचार कंपन्यांकडून AGR अंतर्गत  94000 करोड रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आलेत. यात व्याज आणि दंड पकडून ही रक्कम तब्बल 1.3 लाख करोड इतकी होतेय. 

वोडाफोन कधीही भारतातून आपला गाशा गुंडाळू शकते अशा देखील बातम्या येतायत. मात्र, कंपनीकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिली गेलेली नाही.  

आमच्या ग्राहकांना उत्तमोत्तम डिजिटल अनुभव घेता यावा यासाठी Vodafone Idea ने एक  जारी केलंय. यामध्ये 1 डिसेंबर पासून दरांमध्ये वाढ करणार असल्याचं नमूद करण्यात आलंय. दरम्यान,  Vodafone Idea नेमकी किती दरवाढ करणार याबद्दल कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. वोडाफोन आयडिया चे भारतात  300 दशलक्ष ग्राहक आहेत. 

Webtitle : vodafon idea to increase tariff rates from 1st december 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com