

Historic Debut: Wada Taluka Hosts Its First-Ever Grand Bullock Cart Race
Sakal
वाडा : वाडा तालुक्यातील सापरोंडे- मांगाठणे हद्दीतील स्व.कुंदन पाटील मैदानावर आज रविवार (ता.३) रोजी तालुक्यात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतींचे भव्य आयोजन करण्यात आले होते.या बैलगाडा शर्यतींचे उद्घाटन खासदार डाॅ.हेमंत सवरा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या बैलगाडा स्पर्धेत रायगड,पुणे नाशिक, रत्नागिरी, ठाणे,सातारा पालघर यांच्यासह गुजरात राज्यातील वापी व शेलवासा येथील ४४२ बैलगाडा चालकांनी सहभाग नोंदविला होता.विना काठी,विना लाठी या तत्त्वावर या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.