Hit And Run: मुंबईत पुन्हा हिट अँड रनची घटना! मद्यधुंद अवस्थेतील चालकाने महिलेसह चिमुकल्यावर कार चढवली अन्... घटनेनं हळहळ
Wadala Hit And Run: मुंबईत हिट अँड रनच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आज वडाळ्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. यात एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे. तर महिला जीवनाशी लढा देत आहे.
मुंबईतून पुन्हा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. वडाळा परिसरात रविवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका कारचालकाने घराबाहेर झोपलेल्या महिला आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलावर कार चढवली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.