esakal | चेहऱ्यावरील दुर्मिळ गाठीने ग्रस्त चौदा दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया | Wadia hospital
sakal

बोलून बातमी शोधा

child

चेहऱ्यावरील दुर्मिळ गाठीने ग्रस्त चौदा दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : अकाली जन्मलेल्या 14 दिवसांच्या बाळावर मुंबईतील वाडिया रुग्णालयात (Wadia hospital) यशस्वी शस्त्रक्रिया (successful surgery) करून जीवदान देण्यात आले. या बाळाची हेमन्जिओमा प्रकारातील चेहऱ्यावरील अत्यंत मोठ्या आणि तुलनेने दुर्मिळ गाठीवर यशस्वी उपचार करण्यात आले. या बाळाच्या (child) चेह-यावर गर्भातच (lump on face) असताना 15 x 12 सेमी ची गाठ होती. त्यामुळे, या बाळाला श्वास घेण्यासही अडथळा येत होता.

हेही वाचा: मुंबई : शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक, संस्थाचालकांची जय्यत तयारी

हेमन्जिओमा म्हणजे काय ?

हेमन्जिओमा ही त्वचेतील अतिरिक्त रक्तवाहिन्यांपासून बनलेली गाठ आहे. लहान बाळामध्ये अशा प्रकारच्या गाठ असलेल्या हेमन्जिओमाची घटना दुर्मिळ असून त्याचे प्रमाण 1 टक्के इतके आहे. हे प्रमाण प्रति 100000 व्यक्तींमध्ये 5 असे आढळून येते. बाळाच्या जन्मापूर्वीच आईच्या उदरात असताना करण्यात आलेल्या अल्ट्रासोनोग्राफीद्वारे ही गाठ असल्याचे आढळून आले. ही गाठ खूप मोठी होती त्यामुळे श्वास घेण्याच्या जागेवर आलेल्या दबावामुळे बाळाला जन्मानंतर स्वतंत्रपणे श्वास घेणे अशक्य होते.

शस्त्रक्रियेपूर्वी तोंडावाटे प्रोप्रानोलोल टॅब्लेटसह उपचार करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु त्याच्या मोठ्या आकारामुळे आणि वायुमार्ग आणि चेहऱ्याच्या महत्वाच्या रचनांमुळे कॅथेटरायझिंग करून आणि त्यांना स्क्लेरोझ करून शस्त्रक्रिया करण्यात आली. बाळाला स्वतंत्रपणे श्वास घेण्यास मदत करण्यासाठी ट्रेकोओस्टोमी प्रक्रिया देखील केली गेली. आता, बाळ 77 दिवसांचे आहे आणि बरे झाले आहे.

हेही वाचा: नवऱ्याचे स्टेटस बाजूला ठेवून स्वतःचे स्थान निर्माण करा - अमृता फडणवीस

बाळ झाल्यानंतर पालक डिंपल आणि गुलशन खुप आनंदित झाले मात्र, हा आनंद फार काळ टिकून राहिला नाही. मात्र, आता शस्त्रक्रियेतून बरे झालेल्या बाळाला बघून त्याचे पालक आनंदित आहेत. बाई जेरबाई वाडिया रुग्णालय फॉर चिल्ड्रेनच्या बालरोग विभाग प्रमुख डॉ. सुधा राव यांनी सांगितले, “ एमआरआय आणि नाकाची एंडोस्कोपी करताना बाळाला हेमन्जिओमा असल्याचे निदान झाले.

ही गाठ सहसा चेहरा, टाळू, छाती किंवा पाठीवर दिसून येते. अकाली किंवा कमी वजनाच्या बाळांना हेमन्जिओमा होण्याची शक्यता असते. या मुलाला कॅथ लॅबमधील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टने स्क्लेरोसंट इंजेक्शन दिले. मुलावर योग्य वेळी उपचार न केल्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते. अशा गाठी सामान्यतः जन्मानंतर काही महिन्यांनी आकारात वाढतात. म्हणून, या ट्यूमरवर वेळेत उपचार करणे फार महत्वाचे आहे.

loading image
go to top