esakal | नवऱ्याचे स्टेटस बाजूला ठेवून स्वतःचे स्थान निर्माण करा - अमृता फडणवीस |Amruta fadnavis
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis

नवऱ्याचे स्टेटस बाजूला ठेवून स्वतःचे स्थान निर्माण करा - अमृता फडणवीस

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : नवऱ्याचे स्टेटस (husband status) बाजूला ठेवून पत्नीने स्वतःसाठी काहीतरी केले पाहिजे, स्वतःचे स्थान (Wife self identity) निर्माण केले पाहिजे, असा कानमंत्र अमृता फडणवीस (amruta Fadnavis) यांनी उपस्थित महिलांना दिला. घरगुती हिंसाचार क्षेत्रात काम करणाऱ्या ‘अंत्योदय प्रतिष्ठान’ ने महिलांशी संबंधित कौटुंबिक हिंसाचार (family violation) या विषयावर शब्द हिताचे, हात मदतीचा या परिषदेचे आयोजन नुकतेच केले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होत्या. या परिषदेचे आयोजन ‘अंत्योदय प्रतिष्ठान’च्या नीता प्रसाद लाड आणि सायली प्रसाद लाड यांनी केले होते.

हेही वाचा: शाहरुखच्या मुलाला एनसीबीने घेतलं ताब्यात; चौकशी सुरु

स्त्री ही स्वयंनिर्भर असते व त्यामुळे तिने पतीचे जे काही स्टेटस असेल ते बाजूला ठेवून स्वतःसाठी काहीतरी केले पाहिजे. अन्यायाविरुद्ध महिला उभ्या राहिल्या तर अत्याचार कमी होतील. आता नवरात्री सुरु होत आहेत, हा स्त्रीत्त्वाचा उत्सव आहे. महिलांनी एकत्रितपणे लढा दिला तर महिलांविरोधातील अत्याचार कमी होतील. ही प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची यात्रा आहे आणि ती पुढे चालू ठेवली पाहिजे, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

हेही वाचा: मुंबई : शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक, संस्थाचालकांची जय्यत तयारी

महाराष्ट्रात शक्ती कायदा लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. प्रत्येक स्त्रीला तिचा अधिकार माहित हवा. येणारा काळ कठीण असून त्यासाठी लढायची तयारी ठेवली पाहिजे. त्यासाठी कायदे, अधिकार जाणून घेतले पाहिजेत. आपल्याला कोणीही घराबाहेर काढू शकत नाही, हे जाणून घेतले पाहिजे. कौटुंबिक किंवा घरगुती हिंसाचाराच्या घटनेत महिलेप्रमाणेच पुरुषाचेही समुपदेशन केले गेले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

घरगुती हिंसाचाराला सामोरे जाणाऱ्या महिलांना योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे असते. ‘अंत्योदय प्रतिष्ठान’तर्फे आम्ही हे काम करू शकलो, याचे समाधान आहे, असे सौ. नीता प्रसाद लाड म्हणाल्या. यावेळी सायली प्रसाद लाड यांनी ‘अंत्योदय प्रतिष्ठान’च्या पुढील वाटचालीबाबत उपस्थितांसमोर रूपरेषा सादर केली.

loading image
go to top