esakal | माथेरानला पर्यायी मार्गाची प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

माथेरानला पर्यायी मार्गाची प्रतीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई (Mumbai) जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून लौकिक असलेल्या माथेरानला जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. हा मार्ग वारंवार कोसळणाऱ्या दरडींमुळे धोकादायक झाला असतानाच पर्यायी मार्गाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

भविष्यातील गरज ओळखून काही पर्यायही पुढे येत आहेत. त्यामध्ये पश्चिमेकडील सनसेट पॉईंटवरून घोदाणीमार्गे पनवेल हा मार्ग आणि रोप वे अग्रभागी आहे. माथेरानचा शोध ब्रिटिश कलेक्टर हुज मॅलेट यांनी १८५० मध्ये लावला. त्यावेळेस मॅलेट हे माथेरानच्या दक्षिणेस असलेल्या वन ट्री हिल पॉईंटच्या घळईतूनवर आले होते; तर जाताना रामबाग येथून चालत गेले. त्या वेळेला रामबाग पॉईंटचा रस्ता हा माथेरानचे प्रवेशद्वार म्हणून संबोधले जात होता. पण हे रस्ते फक्त आदिवासासाठी आहेत. माथेरानकर आणि १३ आदिवासी वाड्यांची वरोसे ग्रुप ग्रामपंचायत यांनी एकत्र मिळून या रस्त्यावर श्रमदान केले आहे.एमएमआरडीए फिनॅक्युलर रेल्वे करणार का ?

हेही वाचा: आधी सक्षम पर्यायी मार्ग उपलब्ध करा!

माथेरानच्या पर्यायी मार्गासाठी अनेक नवनवीन उपाययोजना माथेरानकरांना दाखविल्या गेल्या. २००७ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी फिनॅक्युलर रेल्वेसाठी आग्रही होते. पण काही कारणामुळे ते होऊ शकले नाही. आता फिनॅक्युलर रेल्वेसाठी एमएमआरडीए सकारात्मक असल्याचे समजते.

loading image
go to top