

Dhananjay Munde Resignation: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा देवगिरी बंगल्यावरच लिहून घेण्यात आला होता. अधिवेश सुरू होण्याआधी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन त्यांना कार्यमुक्त करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर आपण सदसद विवेवबुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणास्तवसुद्धा राजीनामा दिला असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.