esakal | बंगालसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करण्याचा प्रयत्न, NCP चा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

बंगालसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करण्याचा प्रयत्न, NCP चा आरोप

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: "इन्कम टॅक्स (Income tax) अधिकाऱ्यांना काही माहिती हवी असेल, तर ते खुलासे मागू शकतात. पण ज्या पद्धतीने धाडी टाकल्या जात आहेत, त्यातून ज्या राज्यात भाजपा विरोधात सरकार आहे, त्यांना त्रास देण्याचा, बदनाम करण्याचा हेतू स्पष्ट होतो" असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) म्हणाले.

"जी परिस्थिती बंगालमध्ये आहे, तशीच परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. ईडी असेल, एनसीबी या सगळया यंत्रणेचा वापर करुन, महाराष्ट्र सरकारला, त्यांच्या नेत्यांना बदनाम करण्याचं भाजपाचं कारस्थान आहे" असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

हेही वाचा: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा शाळेत गोळीबार; दोन शिक्षकांचा मृत्यू

"भाजपवाल्यांना वाटत असेल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते घाबरतील, पण आमचं सरकार अधिक भक्कम होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वेगळं लढूनही ७० टक्के जागा आघाडीला मिळाल्या आहेत" असे नवाब मलिक म्हणाले. "शेतकऱ्यांवरचा अन्याय थांबत नाही. म्हणून महाराष्ट्र बंदची हाक तीन पक्षांनी दिली आहे. केंद्रातल्या जुलमी भाजपा सरकारविरोधात पुकारलेल्या बंदला पाठिंबा मिळेल" अशी अपेक्षा व्यक्त केली.

loading image
go to top